सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे...
आपल्याकड़े सर्व भारतात, प्रत्तेक शहरात, प्रत्तेक तालुक्यात,आणि प्रत्तेक गावात, आणि शहरातील व गावातील प्रत्येक शाळेत अगदी मोफत... शासकीय आरोग्य विभागातर्फे Measle + Rubela लस मोहिम येत्या नोव्हेंबर महिन्यात सुरु होत आहे.
तरी प्रत्येक नागरिकांनी फक्त शासनाची किंवा आरोग्य विभागाचिच जबाबदारी न समजता तुमचे गाव, तुमच शहर ,आपल्या कुटुंबातिल मूल ही सामाजिक संकल्पना मनात ठेऊन आपल्या गावातील व शहरातील प्रत्येक बालकांला हवेतुन पसारणाऱ्या रोगापासुन ही लस देऊन त्यांना संरक्षण देता येईल या साठी प्रयत्न करुन आमच्या आरोग्य विभागाच्या मोहीमेत सामिल व्हा ही विनंती , आपल्या कड़े एखाद्या चांगल्या मोहीमेची सुरुवात होण्या अगोदर "अफवा" हया हवेतुन पसरणाऱ्या जंतुपेक्षा अधिक वेगाने आधी पोहचतात,
तरी आपण सगळे सुशीक्षित असून, हया लस बद्दल तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या पालकांच्या मनातले गैरसमज असतील तर त्यांची समजूत घालून त्यांना लस घेऊन बालकांना सुरक्षित करण्यास सांगा .
ही लस "9 महीने ते 15 वर्ष" पर्यंतच्या बालकांना द्यावयाची आहे म्हणजेच प्रत्तेक "10 वी " तील विद्यार्थ्यांना compulsorily द्यावयाची आहे .
【सुरक्षितता 】: - M/R लस अत्यंत सुरक्षित आहे, Safe आहे घाबरण्याचे कारण नाही.
१) आता पर्यंत 9 कोटी 60 लाख बालकांना भारतात हि लस दिली गेलेली आहे.
२) आतपर्यंत 9 राज्यांमध्ये हि M/R ची मोहीम राबविली गेली आहे तरी कोणत्याच बाळाला/मुलांना याचे काहीही दुष्परिणाम झालेले नाही.
३) हि लस 10 डोसेस ची असणार आहे.
४) हि मोहीम 5 आठवडे चालणार आहे.
५) तसेच ही लस AD सिरिंज द्वारे दिली जाते.
ही सिरिंज एकदा वपरात आल्यावर आपोआप lock होऊन त्या सिरिंज चा वापर पुन्हा करता येत नाही.
ही सिरिंज फक्त "गवर्नमेंट हॉस्पिटल" येथेच उपलब्ध असून तुमचे बाळ अधिक कसे सुरक्षित राहिल याची अधिक काळजी घेतली जाते. तरी आपल्या बाळाला / मुलाला ही लस देऊन होणाऱ्या आजारापासून सुरक्षीत ठेवा.
हा आजार झाल्यास होणारे विपरीत परिणाम. 【 लक्षण】: -
गर्भवती मातेला रुबेला झाल्यास तिच्या होणाऱ्या बाळास हा आजार होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे त्या बाळास खालील बाबी होण्याची दाट शक्यता असू शकते.
१) बाळाचा मेंदू छोटा असू शकतो.
२) बाळ जन्मत:च अपंग असू शकते.
३) बाळाचे डोळे तिरपे तसेच डोळ्यात टिक असू शकते.
४) बाळाला M/R लस न दिल्यामुळे संपूर्ण भारतात ५० हजार बालके मृत्यू पावतात.
५) बाळास आंधळेपणासुद्धा येऊ शकतो.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ही मोहीम फक्त शासनाची किंवा आरोग्य विभागाचीच जबाबदारी न समजता "आपलं शहर,आपलं मूल" ही सामाजिक संकल्पना मनात ठेऊन आपल्या शहरातील प्रत्येक बालकाला हवेतून पसरणार्या या रोगापासून वाचविण्यासाठी ही लस देऊन संरक्षण देता येईल, यासाठी प्रयत्न करु या.. पुणे मनपा आरोग्य विभागाच्या या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होवूया.
बाळाला / मुलांना M/R लस न दिल्यामुळे संपूर्ण भारतात 50,000 बालके मृत्यू पावतात.
आरोग्य विभाग
लसीकरण केंद्र
पुणे महानगर पालिका
राष्ट्रीय गोवर_रुबेला (MR) लसीकरण मोहिम
लस न दिल्यास होणारे आजार
1) गोवर आजार गंभीर आहे. फक्त पुरळ येणे म्हणजे गोवर नाही , तर गोवर आजारामुळे त्या मुलाची प्रतिकारशक्ती कमी होते व इतर आजाराने मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.
2) भारतात गोवर मुळे अनेक मुले दगावतात.
(गोवर डोस पूर्ण देत नाही. पहिला डोस 9 वा महिन्यात व दूसरा डोस 16 ते 24 महिने डोस पूर्ण न करणे.)
4) रूबेला हा पण संसर्गजन्य आहे.
5) त्यामुळे सर्दी, डोळे लाल होणे, ताप, कानाला सूज येणे. गरोदरपणात रुबेला आजार झाला तर होणाऱ्या बाळाला जन्मजात व्यंग , मोतीबिंदू होऊ शकतो किंवा सी.आर.एस. हा आजार होऊ शकतो.
-------------------------------------
डोस दिल्यास
1) गोवर व रूबेला आजाराची प्रतिकार शक्ती मिळते.
2) रूबेला पासून सुटका.
3) गोवर पासून मुक्तता.
---------------------------------------
प्रत्येक विद्यार्थी यांना प्रमाणपत्र
--------------------------------------
लस किती सुरक्षित
1) 1 सूई एकदाच वापरता येते (ऑटो सिरिन).
2) 2 ते 8 अंश सेल्सियस तापमानात असते.
3) अनुभवी डॉक्टर.
4) उजव्या दंडला डोस.
5) 30 मिनट विद्यार्थी देखरेकीखाली असणार.
6) सोबत एमर्जेन्सी किट 1 डॉक्टर, 1 आरोग्य सेविका व 3 मदतनीस
7) सर्व दवाखान्याशी संपर्क असणार.
---------------------------------------
कोणाला द्यावी
1) 9 महिने ते 15 वयोगटातील सर्व मुले व मुली
2) पुर्वी दिली असेल तरी
3) 10 वी चे सर्व मुलांना देण्यास काही हरकत नाही.
4) अंध ,अपंग विद्यार्थी असेल तरी
---------------------------------------
कोणाला नाही द्यायची
1) खूपच आजारी असेल तर.
2) एडमिट असेल तर.
----------------------------------------
डोस तारीख 27 नोव्होंबर 2018 पासून मोहीम चालू होईल.
मेसल्स आणि रुबेला टीकाकरण काढून टाकणे
मेसल्स आणि रूबेला लसीकरणांवर शंकानिरसन
महत्वपूर्ण सूचना
मेसल आणि रुबेला यासाठी काय म्हणायचे आहे ते सर्वांना सांगा
भारता मधून मेसल्स आणि रुबेला या आजाराला काढून टाकणे आपल्या हाथा मध्ये आहे
मेसल्स आणि रुबेला या आजाराला माघे टाकून जबाबदार पालक बना