पथ विभाग

Select Projects

सायकल प्लॅन

पुणे शहरांमध्ये लोकांचा सायकलिंग, सार्वजनिक वाहतूक आणि रस्त्यांवरुन चालण्याचा अनुभव सुरक्षित, सोयीस्कर आणि आरामदायक असायला हवा. शहराच्या वाहतूक यंत्रणेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुणे महानगरपालिकेने 2016 मध्ये ‘पुणे सायकल प्लॅन’ तयार केला. महापालिकेच्या या उपक्रमाला शहरी विकास मंत्रालय आणि केंद्र सरकारने समर्थन दिले आहे. पुणे महानगरपालिकेचा वाहतूक विभाग यावर सक्रियदृष्ट्या काम करीत आहे.
 

सायकल प्लॅनची ४ प्रमुख उद्दिष्टे

  • पुणे सायकल प्लॅनअंतर्गत शहरात ३०० किलोमीटरचा सायकल ट्रॅक तयार करण्याची योजना
  • या ट्रॅकची रुंदी, लांबी, जंक्शन इत्यादी बाबींचा तसेच इतर आणखी संबंधित गोष्टींचा समावेश असणारी व्यापक मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे
  • सायकल शेअरिंगसाठी सार्वजनिक यंत्रणा निर्माण करणे, पहिल्या टप्प्यात 3000 सायकल, 250 स्थानके आणि 40 विभागांचा समावेश
  • अतिक्रमण रोखण्यासाठी ट्रॅकची रचना, सायकल वॉर्डन, सीसीटीव्ही आणि ई-चलन्ससह अंमलबजावणीची योजना

प्रकल्पाची सद्यस्थिती

  • सल्लागारांची नियुक्ती – आयट्रान्स, प्रसन्न देसाई आर्किटेक्ट्स आणि सेंटर फॉर एनव्हॉयरमेंट एज्युकेशन
  • सार्वजनिक सहभाग आणि माहिती संकलनानंतर प्राथमिक मसुदा तयार
  • सायकलस्वार आणि सायकल ट्रॅकसाठी वाहतूक परिस्थितीचा अभ्यास सुरु
  • प्रवासाची पद्धत, सायकलिंगविषयी मत इत्यादीबाबत सुमारे 10000 लोकांचे सर्वेक्षण
  • सर्व प्रभाग कार्यालये, सायकल दुकाने, शाळा, कॉलेज, कंपन्यांसोबत चर्चा

लिंक: https://punecycleplan.wordpress.com

क्लिक करा- पुणे सायकल प्लॅन विस्तृत स्वरुपात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

क्लिक करा- पुणे सायकल प्लॅनबाबत पुस्तिका