घनकचरा व्यवस्थापन विभाग

Select Initiatives

बायो सीएनजी

बायोगॅसचा उपक्रम: वाया गेलेल्या अन्नावर पर्याय आणि त्यातून पर्यावरणपूरक इंधननिर्मिती

कचरा कमी करणे (reduce), त्याचा पुनर्वापर (recycle), पुनर्निमिती (recycle) आणि पुनर्प्राप्ती (recover) या चार तत्त्वांचा वापर करून पुणे महानगरपालिकेने कचर्‍याच्या व्यवस्थापनाचे आदर्श नमुने तयार केले आहेत.

अनेक नागरिकांनी टाकून दिलेल्या अन्नातून मोठ्‌या प्रमाणात कचरा निर्माण होतो. या कचर्‍यावर प्रक्रिया करून केवळ विल्हेवाट लावली जात नसून त्यातून पर्यावरणपूरक इंधनाची निर्मिती करण्यात येते. या वीजेवर भविष्यात शहर वाहतूक करणार्‍या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या बसेस धावणार आहेत. हे इंधन सीएनजीपेक्षा अधिक स्वच्छ आणि स्वस्त असणार आहे. या प्रकल्पासाठी नोबल एक्सचेंज एन्व्हायरनमेंट सोल्युशन्स प्रा. लि. (नेक्स) ही संस्था भागीदार आहे. सिरम इन्स्टिट्युटचे सहकार्य असलेल्या आदर पूनावाला यांच्या स्वच्छ शहर चळवळीद्वारे नेक्सला निधी पुरविण्यात येतो. पुण्यापासून ३५ किलोमीटर अंतरावर तळेगाव औद्योगिक परिसरामध्ये बायो मिथेनेशनचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यानंतर अवघ्या अकरा महिन्यात येथे दररोज ३०० टन बायो मिथेनेशनची प्रक्रिया सुरु झाली आहे.

वाया गेलेल्या अन्नातून निर्माण झालेला कचरा व्यवस्थित करून त्यावर प्रक्रिया करून त्याला वाहतूक करता येण्याजोग्या स्वरुपात बदलण्यासाठी आणि तळेगाव येथील प्रकल्पावर पाठविण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या परिसरात १५ हजार स्क्वेअर फूटाची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व कामासाठी पुणे महानगरपालिका आवश्यक त्या परवानग्या मिळवून देण्यासाठी आणि शहरातील हॉटेल्स, उपहारगृहे, उद्याने आणि बाजारांमधून संकलित करण्यासाठी सहकार्य करते. संकलित झालेला अन्न कचरा वेगळा करून बाणेर येथील केंद्रातून तळेगाव येथील प्रकल्पावर पाठविण्यात येतो. बाणेर येथील केंद्र सर्व सुविधांनी युक्त आहे. तळेगाव येथील केंद्रावर कचर्‍यापासून बायोगॅस तयार करण्याची प्रक्रिया दुर्गंधीविरहित आणि कोणताही आवाज न करता शांतपणे पार पाडली जाते. त्यासाठी पाण्याद्वारे कचर्‍याची स्वच्छता करून त्यातून कॉम्प्रेस्ड बायोगॅस तयार करर्‍यात येतो. या सर्व प्रक्रियेतून तयार होणार्‍या टाकाऊ बाबी डायजेस्टरमधून (प्रक्रिया करण्याची मोठी पेटी) सहजपणे हाताळता येतात. या प्रक्रियेतून निर्माण होणार्‍या अन्य काही घटकांचा शेतीमध्ये रासायनिक खते म्हणून वापर करण्यात येतो. प्रकल्पातून तयार होणारा कॉम्प्रेस्ड बायोगॅसमधून (सीबीजी) एलपीजी, डिझेल निर्माण करण्यासाठी संस्थात्मक ग्राहकांना देण्यात येतो.

कार्यकर्त्यांचा समूह, संबंधित नागरिक आणि पत्रकार यांनी पुणे महानगरपालिकेचे सह आयुक्त सुरेश जगताप यांच्यासमवेत या प्रकल्पाचा अभ्यासदौरा केला. या प्रकल्पात नागरिकांचा सहभाग घेऊन आवश्यक ती जनजागृती निर्माण करून अधिकाधिक लाभधारकांचा सहभाग घेत विविध वैज्ञानिक आणि विकेंद्रित कचरा व्यवस्थापनाच्या पर्यायांचा स्वीकार केला जाईल, असे आश्वासन जगताप यांनी यावेळी दिले.

या प्रकल्पामुळे कचर्‍यावरील प्रक्रिया केंद्रे महानगरपालिकेसाठी नवी उत्पन्नाची केंद्रे बनतील, संकलन आणि वाहतूकीवरील खर्च कमी होईल. या प्रकल्पातून निर्माण होणारा कॉम्प्रेस्ड बायो गॅस जीवाश्म इंधनावर पर्याय ठरेल.