SOLID-WASTE SERVICES

Select SOLID-WASTE SERVICES

Individual Toilets

वैयक्तिक शौचालय
स्वच्छता प्रभावीपणे निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक कुटुंबाला एक शौचालय देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मालकीहक्क आणि काटेकोरपणे केलेल्या देखभालीमुळे प्रत्येकाला शौचालयाचा प्रभावी वापर करता येतो.

एक घर, एक शौचालय
प्रत्येक घरामध्ये स्वच्छता निर्माण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने `एक घर, एक शौचालय' प्रकल्प राबविला आहे. समाजाच्या सहभागातून कायमस्वरुपी शहरातील गरीबांसाठी शौचालयांची उभारणी करून उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण कमी करून त्यास प्रतिबंध करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामध्ये समाजाच्या सहभाग घेऊन संपूर्ण स्वच्छतेचा दृष्टिकोन निर्माण करणे, सुक्ष्मनियोजन प्रक्रिया आदी बाबींचाही समावेश आहे. 

 

  • शेल्टर-पुणे महानगरपालिका भागीदारी
    पुणे महानगरपालिकेने शेल्टर असोसिएटस्सोबतच्या भागीदारीतून पुणे शहरातील झोपडपट्टी परिसरात ४०० शौचालयांची उभारणी केली आहे. या भागीदारीत पुणे महानगरपालिकेने शौचालयांच्या उभारणीसाठी आणि उभारणीसाठी आवश्यक सामुग्रीसाठी प्रायोजकत्व दिले तर शेल्टर असोसिएटसने आवश्यक ती माहिती संकलित करणे, सांडपाण्याच्या व्यवस्थेतील संभाव्य त्रुटी, लाभधारक कुटुंबांचा शोध घेणे यासह शौचालयांच्या उभारणीच्या कामावर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सांभाळली. तर सामुदायिक सहभागातून शौचालयांच्या योग्य तो वापर करण्याची जबाबदारीही शेल्टरने पार पाडली.