घनकचरा व्यवस्थापन विभाग

Select Partnerships

जनवाणी भागीदारी

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजने २००६ साली जनवाणी संस्थेची स्थापना केली. जनवाणी म्हणजे जनतेचा आवाज. जनवाणी ही एक स्वयंसेवी संस्था असून ती पुणे महानगरपालिका, स्वच्छ सहकारी संस्था (कचरावेचक संघटना) आणि कमिन्स इंडिया लि. सोबत मिळून काम करते. पुणे शहरातील कात्रज येथे जनवाणीने शून्य कचरा नमुना तयार केला आहे.

कचरा वेचकांच्या सहकार्याने कचर्‍याच्या व्यवस्थापन प्रक्रियेचे विक्रेंद्रीकरणासाठी  `शून्य कचरा प्रभाग’ हा नमुना मदत करतो. या नमुन्यातून भारतातील कोणत्याही शहरामध्ये कचरा जमा करणे आणि त्याचे वर्गीकरण असे दोन आव्हाने असल्याचे दिसून आले. शून्य कचर्‍याच्या नमुन्यामुळे कमीत कमी जागेत कचर्‍याचे विघटन किंवा कचर्‍यावर पुनर्प्रकिया करणे शक्य झाले. केंद्र सरकारने कचरा प्रक्रिया केंद्रामध्ये कचर्‍याची विल्हेवाट न लावता प्रभाग स्तरावरच विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या उपक्रमाला पूरक असा शून्य कचर्‍याचा नमुना आहे.

या प्रक्रियेतील निकष खालीलप्रमाणे

  1. घरोघर जाऊन शून्य टक्के कचर्‍याचे संकलन
  2. शून्य टक्के कचर्‍याचे वर्गीकरण
  3. स्थानिक ठिकाणीच कचर्‍यावरील प्रक्रिया