शहरातील चौकांमध्ये सुधारणा आणि पुनर्रचना

शहरातील चौकांची सुधारणा आणि पुनर्रचना ही थेट सुरक्षेशी निगडीत आहे. शहरातील इतर रस्त्यांच्या तुलनेत चौकांमध्ये होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. चौकांमध्ये अपघात होतो तेव्हा वाहनांची संख्या, वाहतूक नियंत्रण आणि एक्सेस पॉईंट्सची फ्रिक्वेन्सी, लोकसंख्या, वाहनांची गती, रस्त्याची विभागणी करणारा मध्यक, त्याची लांबी व रुंदी आणि रस्त्याच्या एकुण रचनेसह इतर मानवी घटक कारणीभूत ठरतात. यामुळे, चौकांची रचना योग्य रीतीने होणे आवश्यक आहे. 

चौकांच्या सुधारणेसाठी खालील घटकांचा समावेश आवश्यक आहे - 

  •  विशिष्ट चौकांमध्ये रस्त्याची विभागणी करणारे मध्यक बंद ठेवणे 
  •  उजवीकडे वळण्यास मनाई
  •  रस्त्याच्या कोपऱ्यात वळण्यासाठी आवश्यक जागा ठेवणे 
  •  रस्त्यावर वळण्यासाठी आवश्यक जागा पुरविणे
  •  रस्त्यावर चॅनलायझर / विभागणी करणारी जागा पुरवणे
  •  चिन्हे / लेनच्या खुणा / पेव्हमेंटच्या खुणांवर प्रकाशाची सोय आणि इतर सर्वसामान्य चिन्हे पुरविणे. पुणे शहरात अशा चिन्हांची सोय आवश्यक असल्याचे आढळून आले आहे. योग्य ठिकाणांवर अशी चिन्हे बसविण्याची शिफारस आहे. 

रस्त्यांवरील चिन्हांचे तीन भागांत वर्गीकरण केले जाते - 

  1.  अनिवार्य / नियामक चिन्हे.
  2.  सावधान/ इशारा देणारी चिन्हे.
  3.  माहितीपूर्ण चिन्हे

शाळांच्या आजूबाजूच्या परिसरात ही चिन्हे बसविण्यास प्राधान्य दिले जावे. वाहनचालकांना डोळ्यासमोर ठेऊन सर्व रस्त्यांवर सेंटर लाईन, ट्रॅफिक लेन लाईन्स, स्टॉप लाईन्स, पेडेस्ट्रियन क्रॉसिंग, पार्किंग स्पेस लिमिट्स, कर्ब मार्किंग फॉर व्हिजिबिलीटी, ऑबस्ट्रक्शन मार्किंग इत्यादी वाहतूक नियंत्रण उपकरणांची सोय करणे आवश्यक आहे. आयआरसी पब्लिकेशन ६७-२००१ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व चिन्हे पुरविली जावीत. 
 

पुणे शहराचा व्यापक मोबिलिटी प्लॅन

लाइटहाऊस सिटी घोषणे (पुणे)

भारतीय शहरात डिजिटल मोबिलिटी बदलणे