घनकचरा व्यवस्थापन विभाग

Select Initiatives

ती – `ती’ शौचालयांची जोडणी

शहरात महिलांसाठी असलेल्या शौचालयांची कमतरता लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेने फिरते शौचालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. पीएमपीएमएलच्या वापरात नसलेल्या बसेसमध्ये बदल करून फिरते शौचालय तयार करण्यात आले. रस्त्यावर धावण्याची क्षमता संपलेल्या बसेसमध्ये बदल करून फिरते शौचालय तयार करण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. अशी शौचालये केवळ महिलांसाठीच तयार करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेचे क्रियाशील आयुक्त कुणाल कुमार यांच्या संकल्पनेतून आलेली फिरत्या शौचालयांची संकल्पना `ती’ या नावाने सुरू करण्यात आली. त्यासाठी साराप्लास्ट प्रा. लि. कंपनीच्या थ्री एस विभागाने पुढाकार घेतला. तर महानगरपालिकेचे सीएसआर भागीदार इंडस टॉवर्स लिमिटेडने यांच्या सहकार्याने ही कल्पना साकारण्यात आली.

या संकल्पनेमागे पुनर्वापराची कल्पना होती. पुणे महानगरपालिका, इंडस टॉवर्स लिमिटेड आणि साराप्लास्ट प्रा. लि.चा विभाग - थ्री एस यांच्या परिश्रमातून पीएमपीएमएलच्या वापरात नसलेल्या बसेसचा आणखी काही वर्षांसाठी पुनर्वापर करणे शक्य झाले. त्यामुळे, नूतनीकरणामुळे पर्यावरणावर होणा-या परिणामात बरीच सुधारणा होईल, हे या प्रकल्पामुळे आढळून आले.

या प्रकल्पामुळे शहरातील महिलांना स्वच्छता आणि प्रतिष्ठा मिळवून देणे शक्य झाले.