GARDENS IN PUNE

Select GARDENS IN PUNE

पुणे शहरातील जुनी उदयाने

छत्रपती संभाजीराजे उद्यान- जंगली महाराज रस्ता, पुणे

 • उद्घाटन सन १९५२
 • क्षेत्रफळ - १६,००० चौ.मी.
 • सन १९३८ मध्ये या उद्यानासाठी जागा राखून ठेवण्यात आली होती.
 • जागेचा योजनाबद्ध उपयोग करुन मोठी बाग तयार करण्यात आली.
 • सन १९५२ साली उद्यानांत पुणे शहराचा उठावाचा नकाशा, सातारचे कलावंत श्री. सावंत यांच्याकडून तयार घेण्यातआला. त्यास रु. ५०००/- खर्च आला.
 • सन १९५४ मध्ये रु. २५,०००/- खर्च करून नागरिकांच्या करमणुकीसाठी बंद वादनाच्या कार्यक्रमासाठी आधुनिक इमारत बांधण्यात आली.
 • इमारतीसमोर कारंज्यासाठी प्रशस्त हौद बांधण्यात आला.
 • सन १९५३ साली रु. ५०००/- खर्च करून एक लक्ष्मीची मूर्ति कमळाच्या तळ्यात बसविण्यात आली.
 • दुर्मिळ वृक्ष- मनीमोहर, रुद्राक्ष, पेटरिया, कैलासपती, गोल्डन बॉटल ब्रश, मोह, भद्राक्ष, सीता अशोक, मुचकुंद, करमळ, कांचन वेल.
 • रामचंद्र गणेश कुंदगोळकर (सवाईगंधर्व) यांचा पुतळा आहे.
 • उद्यानामध्ये शिवमंदिर आहे.
 • किल्ले स्पर्धा, फळे फुले भाजीपाला प्रदर्शन आयोजनाचे ठिकाण

सारसबाग

सन १९५० साली श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी आंबिल ओढयाच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार केला या तलावाचा उपयोग नौकाविहार व हत्तींना पोहण्यासाठी करण्यात येत होता.

 • तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तिर्ण होते.
 • श्रीमंत माधवराव पेशवे यांनी सन १७८४ मध्ये एक छोटेसे मंदिर बांधून आपले उपास्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली.
 • पुणे शहराचे हे गणेश मंदिर आराध्य दैवत असून बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे खास पर्यटन केंद्र आहे.
 • सारसबाग ही किमान २५० वर्ष जुनी आहे. रमण्यासाठी आलेले ब्राम्हण आंबील ओढयाच्या पुरात वाहून गेले म्हणून नानासाहेब पेशव्यांनी आंबील ओढयाला धरण बांधले व त्यातूनच पर्वतीचे तळे निर्माण झाले. तळ्यातील मध्यभागी बाग करण्यासाठी टेकडीवर छोटी जागा राखून ठेवण्यात आली होती. व त्या काळात या छोट्याशा जागेस सारसबाग हे नाव देण्यात आले होते. आजचे पेशवे पार्क ते नवलोबा मंदिर, हिराबाग व आजचे मित्रमंडळ ते वसंतदादा पाटील यांचा पुतळा एवढी या तळ्याची व्याप्ती होती.
 • १९१४ पर्यंत हे तळे अस्तित्वात होते.
 • पुढे सध्याच्या म्युनिसिपलस्पोर्ट्स ग्राउंड आकारास आले. पुढे भुजंगराव कुलकर्णी महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी सिद्धिविनायक मंदिराभोवती बाग निर्माण केली व सारसबागेची व्याप्ती वाढली.
 • रमानाथ झा आयुक्त असताना सारसबागेची पुनर्रचना करण्यात येऊन तिला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

डॉ. गड्डासिंग चिमा उद्यान, येरवडा पुणे

 • सन १९८८ साली विकसित झाले असून स्वातंत्रपूर्व काळातील फलोद्यान शास्त्रज्ञ डॉ. चिमा उद्यानाचे नामकरण करण्यात आले आहे.

श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यान- घोरपडी पेठ

 • उद्घाटन २७ फेब्रुवारी १९५५
 • पुणे शहरामधील हे एकमेव असे उद्यान आहे की या ठिकाणी सर्व स्तरामधील लोक मोठ्या प्रमाणावर येतात.
 • जेष्ठांसाठी फिरण्याकरिता जॉगिंग ट्रक, बालकांसाठी बालक्रीडांगण.
 • मुधोळचे राजेसाहेब श्री घोरपडे यांनी घोरपडी पेठेतील ४ एकर जागामहापालिकेस उदयान निर्मिती करिता दिली.

कमला नेहरू पार्क , एरंडवना, पुणे

 • उद्घाटन- सन १९५२
 • क्षेत्रफळ - १६,००० चौ.मी.
 • सदर उद्यानामध्ये दत्त मंदिर आहे.
 • सन १९५२ मध्ये उद्यान विकसनाचे काम हातात घेवून कलात्मक व रचनात्मक उद्यान विकसित करणेत आले आहे.
 • सन १९५३ साली उद्यानात बालक्रीडांगणची सोय करण्यात आली.
 • भारत-पाक युद्धामध्ये भारतास विजय मिळवून देणाऱ्याविमानाची प्रतिकृती उद्यानात बसविण्यात आली आहे.

छत्रपती शाहू उदयान, सोमवार पेठ, पुणे

 • सन १९५० मध्ये पूर्व भागातील नागरिकांकरिता सोमवार पेठेमध्ये उद्यान तयार करण्याच्या कामास सुरुवात झाली.
 • हिरवळीचे विस्तिर्ण पट, शहाबादी फारशा , फुलझाडांची लागवड करताना केवळ सौंदर्यदृष्टी न ठेवता वनस्पती शास्त्रीय दृष्ट्या उपयुक्त अशा झाडांची लागवड करण्यात आली.
 • १५ फेब्रुवारी १९५३ रोजी पहिले मेयर श्री बाबुराव सणस यांच्या हस्ते शाहू उदयान असे नाव देण्यात आले.

डॉ. जयप्रकाश उदयान, पुणे रेल्वे स्टेशन शेजारी

 • सन १७ ऑक्टोबर १९२७ रोजी डॉ. विल्सन यांचे हस्ते उद्घाटन

कै. तात्यासाहेब थोरात उद्यान

 • उद्घाटन १२ मे १९८६
 • क्षेत्रफळ - १६,००० चौ.मी.
 • एस. के. ४२३ हवाई लढाऊ विमान.
 • उद्यानामध्ये दत्त मंदिर व जयभवानी माता मंदिर आहे.
 • अपंगांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह.

जिजामाता उदयान

 • शनिवारवाडाच्या पूर्व बाजूस छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुनीत झालेल्या जागेत लाल महाल या ठिकाणी महिला व मुलांसाठी उद्यान तयार करण्यात आले.
 • राजमाता जिजाबाई यांच्या स्मरणार्थ या उदयानाचे नाव जिजामाता बाग असे ठेवण्यात आले.
 • नव्याने बांधण्यात आलेल्या लाल महालाचे उद्घाटन १४ मे १९८८ रोजी झाले.

महात्मा गांधी उदयान, बंडगार्डन

 • मुळा मुठा नदीकाठी सन १८६९ साली हा बगीच्या सुरु झाला.
 • सन १९७१ साली महात्मा गांधी असे नामकरण करण्यात आले.
 • ब्रिटिशकाळाच्या आठवणीचे स्मरण करून देणारे उद्यान
 • ऐतिहासिक पहिल्या व दुसऱ्या महायुद्धतील खालाशांचे स्मारक म्हणून उद्यानाची ओळख.

चितरंजन वाटिका , मॉडल कॉलनी

 • उद्घाटन २१ जून १९९६
 • क्षेत्रफळ - २०,००० चौ.मी.
 • मॉडल कॉलनी मधील ५ एकर क्षेत्ररावर नाल्याच्या बाजूस विविध स्थानिक वृक्षांनी भरलेले उद्यान विकसित करण्यात आलेले आहे.
 • शालेय विद्यार्थ्याना वाहतुकीच्या नियमांचे खास प्रशिक्षण देणारे ट्रफिक पार्क विकसित करण्यात आलेले आहे.