प्रधानमंत्री आवास योजना बद्दल

 1. देशाला स्वातंत्र्य मिळून सन 2022 पर्यत 75 वर्षे पुर्ण होत असून देशातील प्रत्येक कुटुंबाला जलजोडणी, शौचालयाची व्यवस्था, 24 तास वीज व पोहोच रस्ता या सुविधांसह पक्के घर असायला हवे, असे विचारात घेऊन पंतप्रधान महोदयांच्या सन 2022 पर्यत सर्वासाठी घरे या संकल्पनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने नागरी भागाकरिता प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. मे.केंद्र शासनाने सदर योजना ही विशेषरित्या नागरी क्षेत्राकरीता लागू केली असून त्याअनुषंगाने सदर योजना राज्यातील नागरी स्वराज्य संस्थाच्या क्षेत्रात लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
 2. केंद्र शासनाने जाहिर केलेल्या सर्वासाठी घरे या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये खालील चार घटक समाविष्ट आहेत.
 • जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करुन त्यावरील झोपडपटट्यांचा आहे तेथे पुर्नविकास करणे.
 • कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाया घरांची निर्मिती करणे.
 • खाजगी भागीदारीद्वारे परवडणाया घरांची निर्मिती करणे.
 • आर्थिकदृष्या दुर्बल घटकांसाठी लाभार्थ्याद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान
 1. वरील पैकी घटक क्रमांक़-2 हा संलग्न व्याजावरील अनुदानासंबधी असून या घटकाची अंमलबजावणी या आदेशाच्या दिनांकापासून राज्यातील सर्व शहरांमध्ये लागू करण्यात येईल. इतर घटक म्हणजेच घटक क्रमांक़-1,3 व 4 विवरण अ मध्ये नमूद 51 नागरी स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात लागू करण्यासही याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.
 2. घरकुलाचे किमान आकारमान नॅशनल बिल्डींग कोड (NBC) ने पुरविलेल्या मानकांप्रमाणे असेल तथापि जमीनीचे क्षेत्र पुरेसे नसेल तर लाभार्थ्यांच्या संमतीने राज्यस्तरीय मान्यता व सनियंत्रण समितीच्या मान्यतेने कमी क्षेत्रफळाची घरे बांधता येतील असे करतांना घरांमध्ये शौचालय सुविधा आवश्यक राहिल.
 • अभियांनातर्गत बांधण्यात येणारी घरे ही कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष व महिला यांच्या संयुक्त नांवावर असतील आणि कर्ती महिला सदस्य नसेल त्या ठिकाणी कर्त्या पुरुषाच्या नांवे घर राहिल.
 • अभियांनातर्गत बांधण्यात येणाया घरांची सहकारी संस्था स्थापन करण्यास प्राधान्य देण्यात यावे / लाभधारकांना सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी प्रोत्साहित करावे.
 • लाभार्थी कुटुंबामध्ये पति-पत्नी व अविवाहित मुले (children) यांचा समावेश असेल. या अभियांनातर्गत केंद्राकडून अनुदान / सहाय प्राप्त करुन घेण्याकरीता , देशातील कोणत्याही भागात लाभार्थी कुटुंबातील व्यक्तीच्या मालकीचे पक्के घर नसावे.
 • या योजनेंअंतर्गत लाभार्थीची पात्रता प्रधानमंत्री आवास योजना , सर्वासाठी घरे – नागरी च्या मार्गदर्शक सूचनांनूसार राहिल.

प्रस्तुत योजना अभियान स्वरुपात (कर्ज संलग्न व्याज सबसिडी घटक वगळता) केंद्र पुरस्कृत योजना म्हणून राबविण्यात येणार आहे.

 1. अभियानाच्या घटकांच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती :-

परीच्छेद 2 मध्ये नमूद केलेले अभियानाखालील ४ घटक माहिती करून घेण्यासाठी येथे क्लिक करा.