प्रधानमंत्री आवास योजना: वैध आणि अवैध अर्जांची यादी

प्रधानमंत्री आवास योजना, पुणे महानगरपालिका
सावरकर भवन,शिवाजीनगर ,पुणे -४११००५.
जाहीर प्रकटन

नागरिकांना कळविण्यात येत आहे की, प्रधानमंत्री आवास योजना ‘’सर्वांसाठी घरे – २०२२‘ या योजनेंतर्गत दिनांक ७ जानेवारी ते ७ ऑगस्ट २०१७ पर्यंत मागणी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या अनुषंगाने परवडणारी घरे (Affordable housing in partnership) या घटकाअंतर्गत प्राप्त घटकामधून अर्जांच्या छानणीचे काम  पूर्ण झाले असून सदर वैध / अवैध यादी खालीलप्रमाणे -

वैध अर्जांची यादी

अवैध अर्जांची यादी

ज्या नागरिकांचे नाव अवैध यादीत आले आहे, त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना कार्यालय, स्वा. सावरकर भवन, पुणे महानगरपालिका येथे कार्यालयीन वेळेत म्हणजेच सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.४५ वाजेदरम्यान संपर्क साधावा. तसेच, वैध यादी ही अंतिम नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

  1. वैध यादीत नाव असलेल्या नागरिकांनी अंतिम लाभार्थी म्हणून गृहीत धरू नये.

  2. वैध यादीत नाव असलेले नागरीकांनी कार्यालयात संपर्क साधू नये तसेच यापुढील होणारे कार्यवाहीबाबत वेळोवेळी वर्तमानपत्राद्वारे जाहिरात देण्यात येईल, याबाबत नागरिकांनी नोंद घ्यावी.

  3. तांत्रिक दृष्ट्या वैध असलेले  अर्जनुसार सोडत काढण्यात येईल .

  4. ज्या नागरिकांनी In Situ Slum / Credit Linked Subsidy / Ben Led Construction or Enhancement या घटकांमध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांच्यासाठी उपरोक्त बाब लागू नाही .

  5. नागरिकांची online सोडत पद्धतीने सोडत काढून  सदनिका वाटप करण्यात येईल.

  6. ज्या लाभार्थ्यांचे अर्ज पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येत नाहीत त्यांनी PMARD, औंध रोड, औंध बॉडीगेट बसस्टॉपमागे, या कार्यालयाशी संपर्क साधावा.