SOLID-WASTE SERVICES

Select SOLID-WASTE SERVICES

Sanitation Overview

सफाईवर दृष्टिक्षेप

शहरातील स्वच्छतेची अवस्था सुधारण्यासाठी पुणे महानगरपालिका अनेक वर्षांपासून वेगवेगळे कार्यक्रम राबविते. पुणे शहरात सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचे मोठे नेटवर्क आहे. सांडपाणी प्रक्रियेच्या सुविधेशी जोडलेल्या नेटवर्कचे व्यवस्थापन पाणीपुरवठा विभाग करतो. पुणे शहराला आवश्यक असलेल्या स्वच्छतेसंदर्भातील सर्व गरजा घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत भागविल्या जातात. याच विभागामार्फत संपूर्ण शहरात गरीबांसाठी शौचालयाची सुविधा पुरविण्यात येते. घनकचरा व्यवस्थापन विभागाने सामुदायिक शौचालयांच्या उभारणीसाठी कार्यक्रम हाती घेतला असून वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयांच्या वापरासंदर्भात जागृती निर्माण करून प्रोत्साहन दिले जाते.

वैयक्तिक आणि सामुदायिक स्वच्छतेच्या कार्यक्रमांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे -

  • शहरातील गरीबांसाठी एक घर एक शौचालय
  • सामुदायिक शौचालये
  • सार्वजनिक शौचालये
  • स्वच्छतेसाठी सीएसआर भागीदारी
  • सीएसआरद्वारे शालेय शौचालये
  • महिलांच्या शौचालयांचा पुणे पॅटर्न