पुणे महानगरपालिकेची सेवा केंद्रे

पुणे महानगरपालिकेच्या सेवा केंद्रांचा प्रमुख हेतू हा शहरातील नागरिकांना उत्कृष्ट दर्जाच्या सेवा पुरवणे व यासोबतच शहरातील तरुण व तरुणींना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करुन देणे हा आहे. पुणे महानगरपालिकेच्या सेवा केंद्रांमध्ये प्लंबिंग, वायरिंग, दगडी बांधकाम, रंगकाम, टीव्ही दुरुस्ती, एसी आणि रेफ्रिजरेटरची दुरुस्ती, डेटा एंट्री, संगणक दुरुस्ती, काचेच्या खिडक्या फिक्सिंग, पाण्याची टाकी, बागकाम इत्यादी कामांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.

अगदी एका फोनवर नागरिकांना 100% योग्य, त्वरित, विश्वासू सेवा वाजवी दरात उपलब्ध होईल! 

सेवा केंद्रे संपर्क तपशील

सेवा केंद्र विभागीय कार्यालय

मोबाईल क्रमांक

सेवा केंद्र विभागीय कार्यालय

मोबाईल क्रमांक

औंध

9689934881

येरवडा

9689934887

कोथरुड

9689934882

धनकवडी

9689936551

घोले रस्ता

9689934880

कसबा / विश्रामबागवाडा

9881225689

ढोले पाटील

7722038934

सहकार नगर / बिबवेवाडी

9689934891

हडपसर

9689937512

टिळक रोड

9689934884

नगर रोड (वडगाव शेरी)

9689934894

वारजे कर्वेनगर

9689934893

भवानी पेठ

9689934923

आधार केंद्र, सिंहगड रस्ता

9689934942

कोंढवा वानवडी

9689936514

राजीव गांधी सुविधा केंद्र

 

  • केंद्राच्या कामकाजाची वेळः सकाळी 9 ते संध्याकाळी 5
  • काम पुर्ण झाल्यावर पावती देण्याची सोय 
  • सेवा घेणाऱ्यांना वाजवी दरात त्वरित सेवेचा लाभ
  • कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची खात्री 
  • सेवा केंद्रांच्या माध्यमातून कुशल कामगारांची सेवा पुरविली जाते 

*पुणे महानगरपालिकेच्या या अनोख्या उपक्रमाचा हेतू हा शहरातील तरुण व तरुणींना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करुन देणे हा आहे. 


 


राजीव गांधी सुविधा केंद्र
(
पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग योजना पुरस्कृत)

राजीव गांधी सुविधा केंद्रातर्फे खालील सेवा / सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात

- घरगुती - व्यावसायिक गॅस दुरूस्ती
- घरगुती उपकरण दुरूस्ती
- एसी-फ्रिज व वॉशिंग मशिन दुरूस्ती
- मोटार वाईंडिग दुरूस्ती
- घरगुती वायरिंग दुरूस्ती

वरील दुरूस्ती विषयक कामे माफक व पुर्व निर्धारित दरामध्ये करून मिळतील.
फोन नं. ०२०-२५४२१०६५

स्थळ:  राजीव गांधी सुविधा केंद्र
पत्ता: श्रीनिवास अपार्टमेंट, रमा - अंबिका मंदिरा जवळ, अलंकार पोलिस चौकी समोरील रस्ता लगत, देवेश दुकानासमोर कर्वेनगर, पुणे.
वेळ: सकाळी १० ते ८ पर्यंत

 


आधार केंद्र
(पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग योजना पुरस्कृत)

दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील व्यक्ती किंवा बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेअंतर्गत आधार केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रांवर बचत गट तसेच व्यक्तींनी तयार केलेल्या वस्तुंची विक्री केली जात असून आकर्षक कलाकुसरीच्या वस्तू व खाद्यपदार्थ योग्य दरात उपलब्ध आहेत.

उदा.- चटण्या, मसाले, पापड, वेफर्स, कुरडई, पिठे, लोणचे, सांडगे इत्यादी खापदार्थ तसेच रूखवताचे साहित्य, गिफ्ट, फाईल्स, मोबाईल पाऊच, तोरण, पर्स इत्यादी विविध प्रकारच्या हस्त कौशल्याचा वापर करून तयार केलेल्या वस्तू.

आजच भेट द्या व खरेदीचा आनंद लुटा!

पत्ता: आधार केंद्र सिहंगड रोड (जुना विठ्ठलवाडी जकात नाक्या शेजारी), पुणे -४११०३०,
वेळ: सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत
फोन: ०२०-२४२५२१