घनकचरा व्यवस्थापन विभाग

Select Initiatives

स्वच्छ सर्व्हेक्षण

स्वच्छतेचा प्रचार करण्यासाठी महानगरपालिकेने अनेक प्रभागांमध्ये स्पर्धेचे वातावरण निर्माण केले आणि अनेक बाबी तपासून प्रभाग स्तरावरील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी सर्व्हे केले. घनकचरा व्यवस्थापनासह प्रभागातील स्वच्छतेसंदर्भातील एकूण नऊ बाबी या सर्व्हेक्षणामध्ये तपासण्यात आल्या. जेथे कचरा निर्माण होतो त्याचठिकाणी त्याचे वर्गीकरण करणे, प्रत्येक घराच्या दारातून कचरा संकलन करण्याची व्यवस्था उभारणे आणि सर्वत्र स्वच्छता निर्माण करणे हे या सर्व्हेक्षणाचे उद्दिष्ट आहे.

संकलित केलेल्या माहितीची वैधता तपासण्यासाठी त्रयस्थ तपासणी समितीची स्थापना करण्यात आली आहे. तपासणी अहवालातून आढळून आलेल्या विसंगतीबाबत संबंधित प्रभागस्तरीय टीमसोबत चर्चा केली जाते. त्यानंतर तयार झालेली माहितीवरून प्रत्येक प्रभागाचे गुणांचा तक्ता तयार करण्यात येतो. हे गुण १ ते ५ च्या दरम्यान दिले जातात. १ गुण म्हणजे संबंधित प्रभाग स्वच्छतेच्या बाबतीत धोक्यात आहे. ते गुण गडद लाल रंगात दर्शविले जातात. तर ५ गुण म्हणजे सर्वोत्तम स्वच्छता. हे गुण गडद हिरव्या रंगात दर्शविले जातात. प्रभागांच्या गुणांवरून शहर स्तरावरील गुणतक्ताही तयार करण्यात येतो.

सर्व्हेक्षण अहवाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा