Quick Links

OVERVIEW & FUNCTIONING

 • महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम कायदा १९७५ मध्ये अस्तिवात आला. या कायद्यातील तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरणास आपल्या अखत्यारीतील सर्व वृक्षांची गणना करणे बंधनकारक आहे.
 • शहरातील वृक्षांची तोड नियंत्रित करुन राज्याच्या नागरी क्षेत्रातील वृक्षांचे संरक्षण व जतन करण्यासाठी अधिक चांगली तरतूद करणे ,तसेच या क्षेत्रात मुबलक प्रमाणात नवीन झाडे लावण्याची तरतूद करणे, हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
 • महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नागरी स्थानिक प्राधिकरणाने एक वृक्ष प्राधिकरण स्थापन करावे. यामध्ये अध्यक्ष व इतर यांच्यासह , कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १५ व्यक्तींचा समावेश असेल.
 • पुणे महानगरपालिकेमध्ये महापालिका आयुक्त हे वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत.

पत्ता

छ.संभाजीराजे उद्यान ,जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिराशेजारी,शिवाजीनगर,पुणे -५ फोन न. ०२०-२५५३८५५३ व ०२०-२५५३२५१४.

ई-मेल - treeauthority [at] punecorporation [dot] org

सेवा

 • पुणे महानगरपालिका हद्दीत वृक्षारोपण करणे.
 • फळे, फुले व भाजीपाला लागवडीची आवड नागरिकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी फुले,फळे, भाजीपाला प्रदर्शनाचे आयोजन करणे.
 • संयुक्त  वन व्यवस्थापन प्रकल्प
 • लहान मुलांना किल्याचे ऐतिहासिक महत्व कळावे म्हणून किल्ले स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करणे 
 • शहरातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृती तसेच आवड निर्माण करणे. तसेच नागरिक व विद्यार्थ्यांचा वृक्ष संवर्धनामध्ये सहभाग वाढवणे या उद्देशाने हरित पर्यावरण महोत्सवाचे आयोजन करणे.
 • मोकळ्या जागा, कॅनॉल, नाले, नदी व  तलाव याठिकाणी वृक्ष लागवड करून सुशोभिकरण करणे.
 • रस्ता दुभाजक  व रस्त्याच्या केडेने  वृक्ष  लागवड करणे.
 • दर ५ वर्षांनी शहरातील वृक्षांची वृक्षगणना करणे.
 • रोपवाटीकांचा विकास करणे.
 • वनमहोत्सव, जागतिक पर्यावरण दिना निमित्त जनजागृती विषयक कार्यक्रम करणे.
 • पावसाळी हंगामात, धार्मिक  सणानिमित्त व इतर  महत्वाच्या   दिवसानिमित्त  रोपांचे  अल्पदरात  वाटप करणे.
 • दिंडी / वारी मार्गावर वारकऱ्यांना बियांचे वाटप करणे.
 • वृक्ष छाटणीस परवानगी देणे.
 • मिळकतीमधील बांधकाम नकाशा मान्य करणेसाठी,बांधकाम पुर्व ना हरकत दाखला देणे.
 • प्रत्यक्ष बांधकामास अडथळा करणारे वृक्ष काढणे/ वृक्षांचे पुनर्रोपण करणेस परवानगी देणे.
 • बांधकामास अडथळा करणार्‍या वृक्षांच्या फांद्या छाटणेस परवानगी देणे.
 • धोकादायक वृक्ष काढणेस परवानगी देणे.
 • पुनर्रोपण करणेच्या बदल्यात करावयाच्या नविन वृक्ष लागवड व संवर्धनापोटी भरलेली अनामत रक्कम परत करणे.
 • बांधकामासाठी वृक्षा बाबत अंतिम ना हरकत दाखला देणे.
 • जाहिरात फलक उभारणेसाठी ना हरकत पत्र देणे.
 • अनधिकृत वृक्ष तोडीबाबत कारवाई करणे.
 • हरित आच्छादन वाढवणे.
 • बी.ओ.टी. तत्वावर रस्ता दुभाजक व वाहतुक बेटे यांचे सुशोभिकरण करणे.

DEPARTMENT INITIATIVES

DEPARTMENT INFORMATION

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. अशोक घोरपडे

पदनाम: सदस्य सचिव (वृक्ष प्राधिकरण विभाग)

ई-मेल आयडी: ashok.ghorpade@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931960

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. हरीष नानगुडे

पदनाम: वरिष्ठ लिपिक

ई-मेल आयडी: treeauthority@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689943069

विभागाची माहिती

विभाग पत्ता: शिवाजी नगर, घोले रोड, पुणे.

दूरध्वनी क्रमांक: +91 25501553

ई-मेल आयडी: treeauthority@punecorporation.org

image