Required Documents

वृक्ष प्राधिकरण

 • वृक्ष प्राधिकरणाकडे करावयाच्या अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्राचा तपशिल.

अ.क्र.

वृक्ष प्राधिकरणाकडे करावयाचे अर्ज

अर्जासोबत आवश्यक असणारे कागदपत्रे

 1.  

वृक्षांच्या फांद्या छाटणीबाबत परवानगीपत्र

 1. अर्ज
 2. प्रत्येक वृक्षांच्या धोकादायक असणार्‍या फांद्याचे स्वतंत्र व सुस्पष्ट रंगीत छायाचित्र व त्यासमोर वृक्षाचे नाव.
 3. वृक्षांच्या फक्त धोकादायक फांद्या परवानगीपत्राप्रमाणे काढणार असल्याबाबतचे हमीपत्र
 1.  

मिळकतीमधील बांधकाम नकाशा मान्य करणेसाठी,बांधकाम पुर्व ना हरकत दाखला घेणे

 1. अर्ज
 2. संबंधित वास्तू विशारदाची स्वाक्षरी असलेल्या बांधकाम विकास विभाग यांचेकडून मान्य करावयाच्या नकाशावर, मिळकतीवर अस्तित्वात असणारे वृक्षांचे क्रमांकासह हिरव्या रंगाने रेखांकित (ट्रेसिंग) करून लोकेशन दाखवून, मानंकानुसार लावायच्या वृक्षांचे निळ्या रंगाने रेखांकित (ट्रेसिंग) करून स्थळ दाखविलेल्या नकाशाच्या ३ प्रती.
 1. मिळकतीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक वृक्षांचा सुस्पष्ट रंगीत छायाचित्र व त्यासमोर वृक्षाचे नाव.
 1. संबंधित जागेच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रांच्या प्रती.
 1.  

१. प्रत्यक्ष बांधकामास अडथळा करणारे वृक्ष काढणे / वृक्षांचे पुनर्रोपण करणे.

२. बांधकामास अडथळा करणार्‍या वृक्षांच्या फांद्या छाटणे.

 1. विहित नमून्यातील अर्ज - प्रपत्र -सी
 2. विहित नमून्यातील हमीपत्र - प्रपत्र -डी
 3. बांधकाम पुर्व ना हरकत दाखल्याची प्रत.
 4. बांधकाम चालू करणेचा दाखला (कमिन्समेंट सर्टीफिकेट)
 5. मनपा मान्य नकाशा (ब्ल्यु प्रिंट) व त्यावर रेखांकित (ट्रेसिंग) करून तोडावयाचे वृक्ष लाल रंगाने दाखविणे व उर्वरित वृक्ष हिरव्या रंगाने दाखविणे.
 6. तोडावयाच्या वृक्षांच्या बदल्यात (१:३ प्रमाणात) करावयाच्या नविन वृक्ष लागवड व पुनर्रोपण करणारे वृक्षांचे ठिकाण निळ्या रंगाने दाखविणे.
 7. तोडावयाचे प्रत्येक वृक्षांचे स्वतंत्र व सुस्पष्ट वृक्ष क्रमांकासह रंगीत छायाचित्र व त्यासमोर वृक्षाचे नाव.
 8. संबंधित जागेच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे.
 9. मे.उच्च न्यायालय,मुंबई यांचे दिनांक २० सप्टेंबर २०१३ रोजीच्या आदेशामधील ANNEXURE-II प्रमाणे हमीपत्र.
 10. सदर ठिकाणच्या मिळकतीवरील वृक्ष न काढता बांधकाम करणे अडचणीचे असल्याबाबतचे संबंधित वास्तुविशारदाचे प्रमाणपत्र.
 1.  

बांधकामासाठी अडथळा करणारे वृक्ष काढणे / पुनर्रोपण करणेच्या बदल्यात करावयाच्या नविन वृक्ष लागवड व संवर्धनापोटी भरलेली अनामत     रकमेची मागणी करणे

 1. अर्ज
 2. अनामत भरलेल्या रकमेची मुळ चलन पावती
 3. मनपा मान्य नकाशावर (ब्ल्यु प्रिंट) संवर्धन करण्यात आलेल्या वृक्षांचे हिरव्या रंगाने स्थळ दाखविणे तसेच वृक्षांचे रंगीत छायाचित्र व त्यासमोर वृक्षाचे नाव.
 4. अनामत रक्कम ज्या कारणास्तव भरलेली आहे, त्याचा दाखला किंवा परवानगीपत्राची प्रत.
 1.  

बांधकामासाठी पुर्णत्वाचा दाखला मिळणेबाबत.

 1. अर्ज
 2. बांधकाम पुर्व ना हरकत दाखलाची प्रत
 3. बांधकाम चालू करणेचा दाखला (कमिन्समेंट सर्टीफिकेट)
 4. मनपा मान्य नकाशावर (ब्ल्यु प्रिंट) मिळकतीमध्ये मानंकानुसार केलेल्या  प्रत्येक वृक्षांचे स्वतंत्र व सुस्पष्ट रंगीत छायाचित्र व त्यासमोर वृक्षाचे नाव.
 5. पुर्वी वृक्ष काढणे / पुनर्रोपण करणेस परवानगी घेतलेली असल्यास, परवानगीपत्राची प्रत व पूर्तता अहवाल रंगीत छायाचित्रासह
 6. वृक्षतोडीच्या बदल्यात केलेल्या नविन वृक्ष लागवडी (१:३ प्रमाणात) बाबतचे रंगीत छायाचित्र व त्यासमोर वृक्षाचे नावासह अहवाल
 7. संबंधित मिळकतीच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे.
 1.  

जाहिरात फलक उभारणेसाठी ना हरकत पत्र देणे.

 1. अर्ज
 2. संबंधित जागेचा सुस्पष्ट रंगीत फोटो
 3. वृक्षाना इजा होणार नसल्याबाबतचे हमीपत्र तसेच जागामालकाचे ना हरकत पत्र
 4. स्टबिलीटी प्रमाणपत्र
 5. structure नकाशा 
 6. जागेचा नकाशा

 

टिप:- उपरोक्त प्रमाणे संपूर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाकडे सादर करणे आवश्यक आहे. अपुर्ण कागदपत्रांचे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत.

वृक्ष अधिकारी