१. स्वयंरोजगार योजना: पुणे महानगरपालिकेतर्फे १८ ते ४५ वयोगटातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी रु.५००० पर्यंत अनुदान दिले जाते.
२. उच्च शिक्षण घेणाऱ्या युवकांना उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य: वैद्यकीय, संगणकविषयक, इंजिनिअरिंग, एमबीए इत्यादी पदविका, पदवी व तत्सम शासनमान्य संस्थेत व्यावसायिक शिक्षण घेणेसाठी शिक्षणाच्या पुर्ण कालावधीत दरवर्षी रु. १०,००० अर्थसहाय्य प्रत्येकवर्षी किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यास दिले जाते.
३. इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांना खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य: इयत्ता ११ वीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खाजगी क्लासची फी रु. १०,००० पर्यंत दिली जाते.
४. सी.ई.टी परीक्षेसाठी अर्थसहाय्य: प्रत्येक लाभार्थ्याला सी.ई.टी. परीक्षेसाठी रु. १०,००० पर्यंत अनुदान दिलेजाते. विद्यार्थ्यांना इ. १२ खाजगी क्लास किंवा सी.ई.टी यापैकी एका योजनेचा लाभ घेता येईल.
योजनांविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी संपर्क साधाः
१)प्रभाग पातळीवरील समुह संघटिकांचे कार्यालय, पुणे
२)तुमच्या जवळील क्षेत्रिय कार्यालय
३)समाज विकास कार्यालय, एस.एम. जोशी हॉल, दारुवाला पूल, रास्ता पेठ, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क साधा- ०२०-२५५०१२८१/८२/८३/८४