Plogathon 2021 : Mega Drive

प्लॉगिंग

या शब्दाची व्याख्या 'अ कॉम्बिनेशन ऑफ जॉगिंग विथ पिकिंग अप लिटर'अशी केली जाते.

प्लॉगिंग हा शब्द 'पिकिंग अप लिटर' म्हणजेच कचरा उचला आणि ‘जॉगिंग’ म्हणजे ‘व्यायामासाठीची दौड’ ह्या दोन शब्दांपासून बनला आहे.

प्लॉगिंग हे स्वत: सह पृथ्वीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सुरु केलेले एक जागतिक अभियान झाले आहे.

एलिक ॲहलस्ट्रोम’ यांनी ह्याची सुरवात केली असून त्यांनी एका कार्यक्रमात माहिती देताना सांगितले कि सर्वाधिक म्हणजे ४,००० जणांनी एकत्र ‘प्लॉगिंग’ केल्याचा

जागतिक विक्रम जरी मेक्सिकोच्या नावाने असला तरी भारतात सर्वसाधारणत: १०,००० लोक विविध ठिकाणी प्लॉगिंग करत असतात.

हीच संकल्पना भारतातील नव्या पिढीने उचलून धरली आहे. कचरा मुक्ती म्हणजे स्वच्छता आणि स्वच्छता म्हणजे आरोग्य ही साखळी लक्षात घेतली, तर 'प्लॉगिंग' चे महत्व लक्षात येईल.

कार्यक्रमाची रूपरेषा

दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत शहरातील प्रत्येक प्रभागांत किमान २ किलोमीटर अंतराचा प्लॉगेथॉनचा मार्ग असेल.

सोबत दिलेल्या प्लॉगेथॉनच्या रूट प्रमाणे प्रत्येक मार्गावरून चालताना रस्त्यावरील कच-याचे संकलन करावयाचे आहे. कचरा संकलनासाठी संबंधीत क्षेत्रिय कार्यालयाने बकेटची व्यवस्था करावयाची आहे.

प्लॉगेथॉनच्या रूट सोबतच सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत असणा-या उद्यानांमध्ये देखील याच प्रकारे सकाळी ७ ते ९ या वेळेत उद्यानात आलेले नागरिक,हास्य क्लबचे सदस्य, यांना सहभागी करून घेऊन प्लॉगिंग ड्राईव्ह उद्यानांमध्ये देखील राबवायचा आहे.

या कार्यक्रमात आपल्या प्रभागातील मा.सभासद, स्वयं सेवी संस्थांचे प्रतिनिधी, गणेश मंडळे, मोहल्ला कमिटी सदस्य, बचत गट, प्रतिष्ठीत व्यक्ती, लेखक, नाटककार, अभिनेते, अभिनेत्री,खेळाडू व सर्व नगरसेवक, मा.आमदार, मा.खासदार (आजी,माजी) इ. यांना सहभागी करून घ्यावयाचे आहे.

दिनांक २४/१०/२०२१ रोजी प्लॉगिंग ड्राईव्ह झाल्यानंतर भिडे पूल या ठिकाणी सर्व मा. सभासद, मनपा अधिकारी व सर्व सहभागी नागरिक, संस्था यांनी एकत्र येऊन स्वच्छतेची शपथ घ्यावयाचे आहे.

 
 

पुणे महापौर प्लॉगेथॉन मेगा ड्राईव्ह २०२१ पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्यावतीने
दि. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी भव्य सायकल रॅलीचे आयोजन

 

पुणे महापौर प्लॉगेथॉन मेगा ड्राईव्ह २०२१ पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्यावतीने दि. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

मुख्य सायकल रॅलीचे मा. श्री. मुरलीधर मोहोळ, महापौर यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आले. यावेळी "सायकल चालवा, पर्यावरण वाचवा", "स्वच्छ पुणे, सुंदर पुणे" असे घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.

याप्रसंगी मा. श्री. गणेश बिडकर, सभासद नेते, मा. श्री. विक्रम कुमार, आयुक्त, मा. श्री. ज्ञानेश्वर मोळक अतिरिक्त आयुक्त, मा. श्री. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, मा. श्री. अजित देशमुख उपायुक्त व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मा. श्री. मुरलीधर मोहोळ, महापौर यांनी बाबा भिडे पूल येथे सर्व माध्यमांच्या उपस्थित "स्वच्छतेची" व "माझी वसुंधरा" बाबत शपथ देण्यात आली. सायकल रॅलीचे आयोजन श्री. सुरेश परदेशी व श्री. नरेंद्र साळुंके यांनी केले.

#PMC

#Plogethon2021

#swachpune

#cyclerally

#पुणे_महानगरपालिका

#प्लोगेथॉनमेगाड्राईव्ह२०२१


 
 

मा. महापौर, पुणे यांच्या संकल्पनेस अनुसरून दिनांक २४/१०/२०२१ रोजी
संपूर्ण शहरभर "प्लॉगेथॉन २०२१ : मेगा ड्राईव्ह" चे आयोजन

 

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत "पुणे महापौर प्लॉगेथॉन २०२१ : मेगा डाईव्ह" अंतर्गत शहर स्वच्छतेमध्ये ५५,२२७ पुणेकरांनी नोंदविला आपला सहभाग.

व्यक्तिगत आरोग्य उत्तम राखण्यासाठी हजारोजण सकाळी जॉगिंग करतात. या जॉगिंगला कचरा संकलनाची जोड दिल्यास समाजासाठीही काही केल्याचे समाधान या जॉगर्सना लाभू शकेल या मा. महापौर, पुणे यांच्या संकल्पनेस अनुसरून दिनांक २४/१०/२०२१ रोजी संपूर्ण शहरभर "प्लॉगेथॉन २०२१ : मेगा ड्राईव्ह" चे आयोजन करण्यात आले होते. संपुर्ण शहरात एकाच वेळी एकूण ५२१ ठिकाणी प्लॉगेथॉन ड्राईव्ह घेण्यात आला असून यामध्ये एकूण ५५,२२७ पुणेकरांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या संपूर्ण उपक्रमांतर्गत एकूण ५७,५६९ किलो प्लास्टिक व इतर सुका कचरा संकलित करण्यात आला.

यावेळी श्री. मुरलीधर मोहोळ, मा. महापौर, पुणे, श्रीमती मुक्ता टिळक, मा. आमदार श्री. हेमंत रासने, मा.स्थायी समिती अध्यक्ष मा. सभासद श्री विक्रम कुमार, मा. महापालिका आयुक्त, डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री मल्लीनाथ कलशेट्टी अध्यक्ष, कोविड आय.इ.सी. कमिटी, पुणे, डॉ. कुणाल खेमनार, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई), श्री. ज्ञानेश्वर मोळक, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि), श्री. अजित देशमुख, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन व मनपाचे इतर अधिकारी उपस्थित होते

#PMC #पुणे_महानगरपालिका

#punemayorplogathon #पुणेमहापौरप्लॉगेथॉन

#swachpune #स्वच्छपुणे


 
 

पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्यावतीने दि. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी
भव्य सायकल रॅलीचे आयोजन

 

पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्यावतीने दि. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

मा. महापौर श्री. मुरलीधर मोहोळ, मा. महापालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार यांनी सायकल रॅलीमध्ये सहभाग घेऊन रॅलीचे नेतृत्व केले.

या प्रसंगी मा. श्री. ज्ञानश्वेर मोळक, अतिरिक्त आयुक्त, मा. श्री. व्ही. जी. कुलकर्णी, मा.मुख्य अभियंता, मा. श्री. अजित देशमुख, उपआयुक्त (घनकचरा विभाग) तसेच इतर मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सदर रॅलीमध्ये रॅली सुरू होण्यापूर्वी वार्मअप सेशन घेण्यात आले व रॅलीच्या मार्गावर आरोग्य, स्वच्छता व प्रदूषण या विषयाची जनजागृती सुद्धा करण्यात आली. सदर रॅलीचे संयोजन श्री. नरेंद्र साळुंखे व श्री. सुरेश परदेशी यांनी केले.

#PMC

#Plogethon2021

#swachpune

#cyclerally

#पुणे_महानगरपालिका

#प्लोगेथॉनमेगाड्राईव्ह२०२१