घनकचरा व्यवस्थापन विभाग

Select Partnerships

आदर पुनावाला स्वच्छ शहर मोहिम

आदर पुनावाला स्वच्छ शहर मोहिम हा सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि आदर पूनावाला यांचा सामाजिक जबाबदारीतून  भारतातील शहरांना अधिक राहण्यायोग्य करण्यासाठी हाती घेतलेला शाश्वत उपक्रम आहे. सेंद्रिय अन्न कचर्याचे वैज्ञानिक आणि प्रभावी पद्धतीने व्यवस्थापन करण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे. सेंद्रिय अन्न कचर्याची जर अवैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली तर सामाजिक, पर्यावरणीय आणि आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामध्ये हरितगृहामधून बाहेर पडणारा विषारी वायू, विषाणू आणि रोगजंतूंची निर्मिती, पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण आदी गंभीर धोके उद्भवू शकतात.

शहरांमध्ये अशा प्रकारचा अन्न/सेंद्रिय कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. अशा कचर्यावर वैज्ञानिक प्रक्रिया करून त्यातून अपारंपारिक ऊर्जा आणि सेंद्रिय खतांची निर्मिती करावी लागते. सध्या महानगरांमध्ये निर्माण होणार्या एकूण कचर्यापैकी ५२-५५ टक्के कचरा सेंद्रिय कचर्याच्या स्वरुपातील असतो. कचरा निर्माण होणार्या ठिकाणावरच जर कचर्याचे वर्गीकरण केले तर त्यातून सेंद्रिय आणि असेंद्रिय कचरा  वेगळा केला तर कमीत कमी जागेत सेंद्रिय आणि असेंद्रिय कचर्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे शक्य होते.
 

पुणे महानगरपालिकेशी आदर पूनावाला (APCC) यांची भागीदारी
घनकचर्याच्या व्यवस्थापनासाठी एपीसीसी पुणे महानगरपालिकेला खालील पद्धतीने मदत करते:

  • अधिक लोकसंख्या आणि अधिक गर्दी असलेल्या ठिकाणी कचरापेट्यांची तरतूद
  • कचरापेट्यातून कचरा उचलण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ आणि वाहनांची सोय
  • प्रभाग स्तरावरच अन्न कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी मोबाईल व्हॅन्सची व्यवस्था
  • कच-याच्या वर्गीकरणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेसोबत मिळून शाळा, मोहल्ला समिती, इमारती, सोसायटी, बाजारपेठांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन.

Link to websitehttp://adarpcleancity.com/index.php