डिजिटल पेमेंट जागरूकता सत्र

पुणे महानगरपालिका व राष्ट्रीय पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांच्या संयुक्तविद्यमाने नागरिकांसाठी दादोजी कोंडे शाळा नं .8, कोतवाल भवन, कसबा पेठ येथे डिजिटल पेमेंट जागरूकता सत्र आयोजित करण्यात आले होते. कॅशलेस पेमेंट उपकरणांचा वापर  व कॅशलेस पेमेंट चे महत्त्व याबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देणे व दैनंदिन जीवनात डिजिटल व्यवहारांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे हा या सत्राचा मुख्य उद्देश होता. सर्व वयोगटातील नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या या सत्रात जवळपास ५० नागरिक सहभागी झाले. यांपैकी ३० महिला तर २० विद्यार्थी होते.

महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख मा. राहुल जगताप यांनी, कॅशलेस पेमेंटसाठी उपलब्ध असलेल्या कार्ड, यूपीआय, भीम ऍप, क्यूआर कोड यांसारख्या विविध कॅशलेस पेमेंट पर्यायांचा वापर कोणकोणत्या ठिकाणी करता येऊ शकतो व तो कसा करावा याबद्दल उपस्थिताना मार्गदर्शन केले. शहराच्या विविध भागांतील नागरिकांसाठी महानगरपालिका लवकरच अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.

 

फोटो पाहण्यासाठी क्लिक करा