लेप्टोस्पायरोसीस

लेप्टोस्पायरोसीस?

लेप्टोस्पायरोसीस हा दूषित पाण्यापासून पसरणारा व लेप्टोस्पायरस या जिवाणूमुळे होणारा आजार आहे. हा रोग प्रामुख्याने अंदमान निकोबार बेटे, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक केरळ व तमिळनाडूमध्ये आढळतो. या रोगाचे निदान रुग्णाचे रक्त व लघवी प्रयोगशाळेत तपासून करता येते.


लेप्टोस्पायरोसीसची लक्षणे

 • तीव्र ताप

 • अंग दुखी / स्नायुदुखी (विशेषत: पाठीचा खालील भाग व पोट-या दुखणे)

 • डोळे लालसर होणे

 • तीव्र डोकेदुखी

 • काही रुग्णांमध्ये कावीळ, धाप लागणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, रक्तस्त्राव होणे तसेच लघवी कमी होणे अशी लक्षणे आढळू शकतात. गंभीर स्वरुप धारण केलेल्या लेप्टोस्पायरोसीस आजाराने काही वेळा रुग्णाचा मृत्युदेखील होऊ शकतो.


रोगप्रसार

रोगबाधीत प्राणी (मुख्यत: उंदीर, डुक्कर, गाई, म्हशी, कुत्री) यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. या प्राण्याच्या लघवीने दूषित झालेले पाणी, माती, भाज्या यांचा माणसांच्या त्वचेशी संपर्क आल्यास हा रोग होतो. भात व ऊस लागवडीच्या प्रदेशात मुख्यत: या रोगाचे प्रमाण जास्त असते. जास्त व अवेळी पाऊस पडल्याने हा आजार होण्याची शक्यता वाढते.


प्रतिबंधात्मक उपाययोजना

हे करा

 • दुषित पाणी, माती किंवा भाज्यांशी मानवी संपर्क टाळणे.

 • दुषित पाण्याशी संपर्क ठेवणे अपरिहार्य असल्यास रबर बूट, हातमोजे वापरावेत.

 • शेती काम करणार्‍यांनी हात मोजे व चिखलात वापरावयाच्या बुटांचा वापर करावा.

 • शेती कामानंतर हात-पाय गरम पाण्याने स्वच्छ धुवा

 • उंदरांची बीळे बुजवा.

 • आवश्यकता भासल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने उंदीर नाशक औषधांचा वापर करावा.

 • गाई गुरांच्या गोठ्यांची स्वच्छता करावी.

 • हातापायाच्या जखमांवर जंतुविरोधी क्रीम लावावे.

 • तापावर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा.

हे करू नका

 • दुषित पाण्यावर वाढलेल्या पालेभाज्या खाऊ नये.

 • धान्य साठ्यात उंदिर होऊ देऊ नयेत.

 • गाई गुरांचे मूत्र शषतात किंवा इतरत्र साठलेल्या पाण्यात मिसळू नये.

 • हातापायावर खरचटले असल्यास पाण्यात / चिखलात काम करू नये.

 • कुठलाही ताप दुर्लक्ष करू नये.


लेप्टोस्पायरोसीस अतिजोखमीचा गट

 • शेतात काम करणारे शेतमजूर, शेतकरी

 • पाळीव प्राण्यांची देखभाल करणारे

 • ट्रक ड्रायव्हर

 • कत्तलखान्यात काम करणारे

 • मच्छिमार

 • कॅनॉल सफाई करणारे कामगार

 • ड्रेनेज, सांडपाणी संदर्भात काम करणारे कामगार

आपण आपल्या अथवा आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या तापाकडे दुर्लक्ष करू नका. विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

लेप्टोस्पायरोसीस बद्दल आवश्यक माहिती सविस्तर जाणून घ्या

 

NICD Leptospirosis Guideline

Leptospirosis do 's and dont 's