पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ संस्थेच्यावतीने 'व्ही कलेक्ट' या उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमाअंतर्गत घरातील टाकाऊ वस्तू फिरत्या 'व्ही कलेक्ट' द्वारे संकलन करणार आहोत. याद्वारे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरातील तसेच शहरातील कच-याचे योग्य व्यवस्थापन होण्यास आणखीन बळ मिळेल, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
सदर उपक्रम ९ ते १३ नोव्हेंबर या पाच दिवसात होणार आहे. नागरिक घरातील टाकाऊ कपडे, तुटकी खेळणी, पुस्तकं, इ-वेस्ट (सर्व प्रकारची उपकरणे), जुनी पादत्राणे, बॅग्स/पर्सेस, सायकल आणि भांडी आदी वस्तू देऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्कः ९७६५९९९५००