जाहीर प्रकटन

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार मंगल कार्यालय, सलुन/ब्युटीपार्लर, लॅाजिंग, कातडी कमावणे व कातडी- हाडेसाठा, रसगुर्‍हाळ, अंडीविक्री, पानपट्टी, धान्यभट्टी, आईस फॅक्टरी, हे व्यवसाय करणा-या व्यवसायधारकांनी उपरोक्त नमूद कायद्यान्वये आरोग्य विभागाचा परवाना धारण करुनच व्यवसाय करणे बंधनकारक आहे.

तसेच दि बॅाम्बे नर्सिग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट 1949 अन्वये खाजगी नर्सिग होम/ हॅास्पीटल/रुग्णालये चालविणार्‍या व्यवसायधारकांनी ही पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे रजिस्ट्रेशन परवाना धारण करुन व्यवसाय करणे बंधनकारक आहे.

परंतु पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्र (जुनी हद्द + दि. 04 ऑक्टोबर 2017 च्या मे.राज्य शासन अधिसूचनेनुसार पुणे शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेली 11 गांवे ) यामधील उपरोक्त नमुद केलेल्या व्यवसायाकरीता संबधीत व्यवसायाधारकांनी परवाने न घेता व्यवसाय सुरु केल्याचे तसेच सदर व्यवसाय सुरु ठेवल्याचे दिसुन येत आहे.

उपरोक्त नमूद व्यवसायांकरिता स्वतंत्र फॉर्म्स आरोग्य कार्यालय, अन्न परवाना विभाग, पुणे महानगरपालिका भवन, शिवाजीनगर, पुणे 411 005 येथे उपलब्ध आहेत. सदर फॉर्मसोबत व्यवसायनिहाय असणारी आवश्यक ती कागदपत्रे जोडुन संबधीत क्षेत्रीय कार्यालयांकडे दाखल करणेत यावा. सदर फॉर्ममधील सर्व माहिती पुर्णपणे व अचुक भरणे आवश्यक आहे. अर्धवट माहिती भरलेले फॉर्म स्विकारले जाणार नाही.

तरी उपरोक्त नमुद केलेल्या व्यवसायधारकांना सुचित करण्यात येते की, आपण आपल्या व्यवसायाकरीता आवश्यक असलेला पुणे महानगरपालिकेचा आरोग्य परवाना या जाहिर प्रकटनापासून एक महिना मुदतीचे आंत प्राप्त करुन घेणेत यावा. आरोग्य परवाना विहीत मुदतीत प्राप्त करुन न घेतल्यास संबंधीत व्यावसायिक संस्था, व्यवसायधारक, व्यवसायाचे मालक यांचेवर उपरोक्त नमूद कायद्यांन्वये विनापरवाना व्यवसायाबाबत कायदेशीर कारवाई करणेत येईल.

 

(डॅा. मनिषा नाईक)                                   (डॅा. रामचंद्र हंकारे)
सहाय्यक आरोग्य अधिकारी                         आरोग्य अधिकारी
अन्न व परवाना विभाग                               पुणे महानगरपालिका
पुणे महानगरपालिका