Quick Links

Array

‘पुर्वेकडील ऑक्सफर्ड’ अशी ओळख असणाऱ्या पुणे शहराला गौरवशाली भूतकाळ लाभला आहे. त्याचप्रमाणे, अभिनव वर्तमान असणाऱ्या शहराचे भविष्यकाळातील चित्रदेखील तेवढेच आशादायी आहे. पुणे महानगरपालिका १९५० सालापासून शहराचे प्रशासकीय व्यवस्थापन करत असून नागरिकांना विविध सेवा पुरवित आहे. महापालिकेचा मुख्यलेखा व वित्तीय विभागामार्फत सर्व प्रकारची वित्तीय कामे पाहिली जातात. आम्ही महाराष्ट्र महापालिका कायद्यातील कलम ९५, ९६ आणि १०० नुसार अनुक्रमे महापालिका आयुक्त, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेचा अर्थसंकल्प बनवितो. याशिवाय, शासकीय नियम, अटी आणि ठरावांनुसार डॉकेट्स/फाईल्सची तपासणी करणे, विहित नमुन्यांनुसार आर्थिक अहवाल तयार करणे व तो प्रकाशित करणे ही विभागाची काही प्रमुख कामे आहेत.

मुख्यलेखा आणि वित्तीय अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली खालील विभाग कार्यरत असतात-

  1. उप लेखापाल (संकलन) विभाग
  2. उप लेखापाल (कोषागार) विभाग
  3. अंतर्गत लेखा परीक्षक (अभियांत्रिकी) विभाग
  4. अंतर्गत लेखा परीक्षक (देयके) विभाग
  5. उप लेखापाल (अतिरिक्त) निवृत्तीवेतन विभाग
  6.  महसुली आणि परीक्षा लेखा परीक्षण विभाग  

 

मुख्य उद्देश

शासकीय नियमांनुसार पुणे महानगरपालिकेचा लेखाजोखा अद्ययावत करणे, संस्थेच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष ठेवणे, शासकीय नियम, अटी आणि ठरावांनुसार डॉकेट्स/फाईल्सची तपासणी करणे ही विभागाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

जबाबदाऱ्या 

आमच्या विभागाकडे महाराष्ट्र महापालिका कायद्यातील कलम ९५, ९६ आणि १०० नुसार अनुक्रमे महापालिका आयुक्त, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा यांचा अर्थसंकल्प बनविण्याची प्रमुख जबाबदारी आहे. 

image