डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह सन २०१९-२० प्रवेशाबाबत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह सन २०१९-२० प्रवेशाबाबत

पुणे महानगरपालिका संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे ०५ येथे सन २०१९-२० चे शैक्षणिक वर्षातील प्रथम व द्वितीय सत्राकरिता टर्म लायनन्स पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश देणेकरिता दिनांक २३ जुलै, २०१९ पासून खालील अटी व शर्तीवर पुणे महानगरपालिकेच्या dbt.punecorporation.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

१) सदर वसतिगृहात प्राधान्याने मागास जाती-जमातीतील तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नाही अशा पुणे शहराबाहेरच्या ग्रामीण भागात राहणा-या व पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, शास्त्र तथा कृषी, कला व वाणिज्य व इतर शाखांतून पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांनाच वसतिगृहात प्रवेश देण्यात येईल. प्रवेशाबाबत अभियांत्रिकी, वैद्यकीय, शास्त्र, कृषी या शाखांतील विद्यार्थ्यांचा प्राथान्याने विचार केला जातो. सदरची प्रवेशप्रक्रिया ही ज्या पाठ्यक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे. त्याचे लगतचे मागील पाठ्यक्रमात मिळालेले गुणानुसार गुणानुक्रमे यादी बनविली जाईल.

2)वसतिगृह प्रवेशासाठीचे नियम, अटी व शर्ती dbt.punecorporation.org या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

३)दिनांक २४ जुलै, २०१९ ते दिनांक ९ ऑगस्ट २०१९ या कालावधीत पुणे महानगरपालिकेच्या dbt.punecorporation.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत.

४)पोस्टाने अर्ज पाठविले व स्वीकारले जात नाहीत. तसेच अपूर्ण व मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रवेश मिळालेल्या व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेशप्रक्रिया करणे जरूरी आहे.

५)ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करीत असताना खालील कागदपत्रांची छायांकित व साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

  • जातीचा दाखला
  • मा. तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला
  • आवश्यक त्या गुणपत्रिका
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचा शिक्का असलेले मूळ बोनाफाईड प्रमाणपत्र
  • आधारकार्ड
  • बॅंक पासबुक झेरॉक्स तसेच अर्जासोबत विद्यार्थ्याचे तीन आयकार्ड साईज फोटो जोडणे आवश्यक आहे.

६)सदर ऑनलाईन भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे दिनांक २४ जुलै, २०१९ ते दिनांक १३ ऑगस्ट २०१९ दरम्यान कार्यालयीन वेळेत समक्ष जमा करावेत.

 

उपायुक्त (समाजकल्याण)
पुणे महानगरपालिका