प्रधानमंत्री आवास योजना

Select PMAY Services

खाजगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती

भागीदारी तत्वावर परवडणाया घरांची निर्मिती :- सदर घटकांतर्गत आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील व्यकतीकरीता शासकीय यंत्रणा व खाजगी संस्थाशी भागीदारी करुन घरकुलांच्या निर्मितीचे उद्दीष्ट आहे. अशा प्रकल्पांकरीता केंद्र शासनाकडून रुपये 1.50 लक्ष प्रति घरकुल इतके अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या घटकाखाली 30 चौ.मी.चटई क्षेत्रापर्यची घरकुले अनुज्ञेय आहेत. या घटकांतर्गत सादर करण्यात येणाया प्रकल्पामध्ये किमान 250 घरकुले असणे आवश्यक आहे. या प्रकल्पासाठी खाजगी तसेच शासकीय / निमशासकीय संस्था स्वतंत्रपणे देखील सहभागी होऊ शकतील.

सदर योजनेखाली घरकुलाचे क्षेत्रफळ / किंमत इ.बाबी निश्चित करण्याचे अधिकार राज्यस्तरीय मान्यता व सनियंत्रण समितीस राहतील.

या घटकाखाली प्राप्त प्रकल्पांना राज्यस्तरीय मान्यता व सनियंत्रण समिती व केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समिती यांचे मान्यतेने राबविण्यास मान्यता देण्यात येत् आहे.