ZOO SERVICES

Select ZOO SERVICES

प्राणी दत्तक योजना

प्राणी दत्तक योजना

तुमच्या आवडत्या प्राण्याचे पालक व्हा! 

मित्रांनो! आपल्या आवडत्या प्राण्यासाठी आपणही काहीतरी करावे असं तुम्हाला वाटत होतं का?

मग तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील तुमचा आवडता प्राणी आता तुम्हाला दत्तक घेता येणार आहे. तुमच्या मनातील इच्छा पुर्ण करण्याची ही संधी सोडू नका. प्राणीसंग्रहालयातील खास प्राण्यासाठी तुम्हीही खास व्हा!

हे खुप सोपं आणि आनंददायी आहे. आणि विशेष म्हणते तुम्ही भरलेले 'दत्तक शुल्क' प्राणीसंग्रहालयातील वन्यजीवांच्या संगोपनासाठी उपयोगात आणले जाईल.

कोण होऊ शकते प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांचे पालक?
अगदी कोणीही! जसे की, तुम्ही, तुमचे कुटुंब, कोणत्याही शाळांचे समुह किंवा वर्ग, वेगवेगळ्या संस्था, व्यावसायिक कंपनी आणि कर्मचाऱ्यांचा समुह इत्यादी

सर्वश्रेष्ठ भेट
एखाद्यासाठी ही सर्वश्रेष्ठ भेटदेखील ठरु शकते.. अनोखी, अर्थपुर्ण, आनंददायी आणि आत्मिक समाधान मिळवून देणारी..

प्राणीसंग्रहालयातील कोणताही प्राणी निवडा आणि आपल्या आवडत्या व्यक्तीच्या नावाने दत्तक घ्या. तुमची ही अनोखी भेट सर्वांना आवडणारी व अविस्मरणीय असेल!

तुम्ही खालील कालावधीसाठी प्राणी दत्तक घेऊ शकता 
- एक दिवस प्रायोजकत्व (प्राणी संग्रहालयातील सर्व प्राण्यांच्या एक दिवसाच्या अन्नाचा खर्च)
- एक ते सहा महिने
- एक ते पाच वर्षे