स्व.राजीव गांधी प्राणी संग्रहालय विभाग

Select SCHEMES & SERVICES

प्राणी अनाथालय सेवा

वन्यप्राणी अनाथालय केंद्र

 

पुणे महानगरपालिकेच्या वन्यजीव अनाथालयाची सेवा २४ तास चालू असते. सुरवातीला या केंद्रातर्फे नागरिकांच्या घरात आणि भोवतालच्या परिसरात आढळणारे साप सुरक्षितरित्या तेथून पकडून त्यांची सुटका केली जात असे. कालांतराने जखमी आणि अनाथ झालेले पक्षी आणि इतर वन्य प्राण्याच्या रेस्कयुसाठी सुद्धा इथल्या कर्मचार्यांना पाचारण केले जाऊ लागले. अशाप्रकारे शहरात आढळणाऱ्या वन्य प्राण्यांच्या सेवेसाठी एक उत्तम प्रकारचे सुविधा केंद्र कार्यरत आहे. वन्यजीव अनाथालयाची स्थपना कात्रज येथल्या तत्कालीन सर्पोद्याना शेजारील सुमारे २.५ एकर जागेत करण्यात आली. महापालिकेने केलेल्या करारानुसार या केंद्राचे संपूर्ण व्यवस्थापन भारतीय सर्पोविद्यान संस्थेमार्फत  करण्यात येते. 

    सन २००७-०८ दरम्यान सदरचे  वन्यजीव सुविधा केंद्र राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या प्रशासकीय नियंत्रण खाली आले आणि त्याबरोबरच त्याचे अधुनिकीकरण करण्यात आले. प्रस्तुत ठिकाणी आधुनिक शस्त्रक्रिया गृह, क्वारंटाइन कक्ष, सर्प कुंड, मर्कट कुंड आणि पक्षांसाठी सुसज्य पिंजरे उभारण्यात आले आहेत. निसर्गात पुन्हा सोडण्यात येणारे प्राणी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याची खात्री करून त्यांना निसर्गात सोडण्यात येते. येथील सर्व प्राणीकक्षांमध्ये आधुनिक सुविधा अस्तित्वात आहेत. तापमान नियंत्रणासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आली असून प्राण्यांच्या अविश्रांत निरीक्षणांसाठी अंतर्गत दुरक्षेपण आणि चित्रीकरणाच्या सुविधा उपलब्ध आहेत.  

प्लॅस्टीकसदृश टाकाऊ पदार्थ अनवधानाने खाल्याने समुद्री पक्षी आजारी पडतात, मासे पकडण्याच्या गळांमुळे कासवे जखमी होतात, वृक्षतोडीमुळे खारीची आणि पक्षांची पिल्ले अनाथ होतात, विजेच्या धक्क्याने माकडीणीचा मृतू होतो आणि तीचे पिल्लू अनाथ होते, वाहनांच्या धडकेने हरणे आणि बिबटेही जखमी होतात. अशा सर्व अपंग आणि अनाथ वन्य प्राण्यांवर येथे उपचार होतात आणि त्यांची उत्तम प्रकारे शुहृषा केली जाते आणि त्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येते. प्राणी पक्षांच्या तस्करीमध्ये जप्त केलेल्या प्राण्यांनाही याच ठिकाणी ठेवले जाते. या कामासाठी एक अद्यावक सुसज्ज वाहन उपलब्ध आहे.        
 

 

प्राणी अनाथालयात दाखल झालेले जखमी पिसोरी हरीण

अपघातात पाय मोडलेला चिंकारा उपचारानंतर

 

 

प्राणी अनाथालयातील तापमान नियंत्रण सुविधा

 

प्राणी अनाथालयाने खास पिलांना भरविण्यासाठी तयार केलेले इंक्युबेटर

इंक्युबेटरमध्ये हॅन्ड पपेटच्या सहाय्याने पिल्लाला भरविताना