पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून आवाहन

मदतीचे आवाहन 

करोना प्रादुर्भाव रोखण्यासोबतच पुणे महानगरपालिका सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनच्या काळात नागरिकांना प्रत्येक स्तरावर शक्य तितक्या सर्वोत्तम सोयी-सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या परिस्थितीतील वाढत्या गरजांमुळे काही गोष्टींची कमतरता भासत असल्याने आम्हाला आपल्या मदतीची गरज आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने विविध स्वयंसेवी संस्था/सोसायट्यांना आवाहन करण्यात येत आहे  की शक्य असल्यास आपण पुढे येऊन जमेल तेवढी मदत करावी.  

 

अपेक्षित मदतीचे स्वरूप 

शिक्षण/नोकरी निमित्त पुण्यात राहत असलेल्या व लॉकडाउनमुळे स्वतःच्या गावी न जाऊ शकलेल्या विद्यार्थी/नागरिकांना अन्न,औषधे व दैनंदिन जीवनावश्यक वस्तू पुरवणे तसेच त्यांची राहण्याची व्यवस्था करणे. 

सद्यस्थितीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता. शहरातील ३ रुग्णालययांमध्ये (एकूण ५० बेड) अतिदक्षता विभाग बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आम्हाला काही उपकरणांची गरज आहे.  या उपकरणांची यादी सोबत देत आहोत. 

 


आपल्या सहकार्यासाठी धन्यवाद 

मदतीसाठी इच्छुक असलेल्यांनी खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर किंवा ईमेल वर संपर्क साधावा
श्री.गजानन कडक 
संपर्क क्र.-9689931103  
Email id - mco [at] punecorporation [dot] org

पुणे महानगरपालिका


 

|     PDF     |     Video     |