पाणीपुरवठा विभाग

Select DEPARTMENT PROJECTS

भामा आसखेड प्रकल्प

भामा आसखेड प्रकल्पाद्वारे पूर्व पु्ण्याला पाणीपुरवठा करण्यात येतो:

दररोज २०० दशलक्ष पाणीपुरवठा करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. पुणे शहरातील नगर रस्ता परिसरात या प्रकल्पाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. या परिसराची लोकसंख्या २०४१ पर्यंत १४.५० लाख होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत K१४०१२/२(१२३)/२००६-NURM-III या क्रमांकाच्या दिनांक ५ जुलै २०१३ च्या पत्राद्वारे ३८०.१६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिका यांनी खालीलप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला आहे.

केंद्र सरकार (५०%) रुपये १९८.०८ कोटी
राज्य सरकार (२०%) रुपये ७६.०३ कोटी
पुणे महानगरपालिका (३०%) रुपये ११४.०५१ कोटी
    एकूण = रुपये ३८०.१६ कोटी

आतापर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देण्यात येणार्‍या एकूण निधीपैकी दोन हप्त्यातील निधी प्राप्त झाला आहे. तर तिसरा हप्ता मिळण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे. आतापर्यंत खालीलप्रमाणे निधी प्राप्त झाला आहे.

केंद्र सरकार रुपये ७६.०३ कोटी
राज्य सरकार (GOM) रुपये ३०.४० कोटी
    एकूण = रुपये १०६.४३ कोटी

भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेद्वारे खालील सहा पॅकेजमध्ये विभाजित करण्यात आली आहे.:

Package No Name Estimated Cost
जॅकवेल आणि पंप हाऊसची उभारणी रुपये ५४.८९ कोटी
प्रक्रियेसाठीचे पाण्याची तरतूद आणि त्यासाठी पाईपलाईन उभारणी रुपये १२७.४४ कोटी
कुरुली येथे पाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे रुपये ५८.६८ कोटी
प्रक्रिया झालेले पाणी पुरविण्यासाठी पाईपलाईन उभारणी रुपये ७०.७७ कोटी
मुख्य पाईप लाईनची तरतूद आणि उभारणी रुपये ५५.०८ कोटी
प्रत्येकी दोन दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता असलेले सात ईएसआरची उभारणी रुपये१२.६९ कोटी

या प्रकल्पासाठी आतापर्यंत १७२.०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. ऑक्टोबर २०१५ पासून स्थानिक आमदार आणि शेतकर्‍यांनी त्यांच्या काही मागण्यासाठी या प्रकल्पाचे काम थांबविले आहे. त्यांच्या मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहोचविल्या आहेत. १३ मे २०१६ रोजी मा. मुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आणि राज्य सरकारचे विभाग आणि संबंधित अधिकार्‍यांचा अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर स्थानिक आमदार आणि शेतकर्‍यांच्या बहुतेक मागण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे जून २०१६ पासून या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू झाले आहे. प्रक्रिया करण्यासाठीचे पाणी प्रकल्पापर्यंत पोहोचविण्यासाठी भामा आसखेड धरणापासून ते भांबोली येथील बीपीटी पर्यंत आठ किलोमीटरची पाईपलाईनचे काम स्थानिक आमदाराने पुन्हा एकदा थांबविले आहे.