Projects

Select Projects

बंडगार्डन बंधारापुणे महानगरपालिकेने बंडगार्डन बंधाऱ्यावर दरवाजे बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. नाशिक येथील सी.डी.ओ.ने प्रत्येकी १५ मीX ४.५० मी आकार असणाऱ्या ५ उभ्या दरवाज्यांची रचना केली आहे. पुणे महानगरपालिकेने सर्व नागरी कामकाज पुर्ण केले असून सिंचन विभागामार्फत यांत्रिकी काम पुर्ण करण्यात आले आहे. पावसाळ्यात पूरामुळे पाटील इस्टेट, संगमवाडी परिसराचे नुकसान होते. यामुळे सध्या अस्तित्वात असलेला बंधारा पाडून त्याठिकाणी दरवाजे बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. 

रॉयल कॅनॉट बोट क्लबने जिल्हा कोर्टात याबाबत याचिका दाखल केली होती. त्यानंतर सामंजस्य करारानुसार पाणी आणि गाळ काढून टाकण्यात आला. सिंचन विभागाने दरवाज्यांचे बांधकाम केले असून त्याची देखभालदेखील विभागामार्फत केली जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च पुणे महानगरपालिकेने उचलला आहे. ब्रिटीशकालीन बंधारा पाडून पाच उभे दरवाजे बसविण्यात आले आहेत. यामुळे पूराची पातळी १.०८ मीटरने कमी झाली आहे. यामुळे नदीचा प्रवाह आणि क्षमता वाढली आहे. या प्रकल्पासाठी एकुण 12,42,45,450 रुपयांचा खर्च आला आहे. प्रकल्पाला १७-११-२०१५ साली वीजपुरवठा सुरु झाला. 

तांत्रिक माहिती 

नदीचे नाव

मुळा-मुठा नदी

लांबी

२७० मीटर

जादा पाणी वाहून जाण्याचा मार्ग

९३ मीटर

सिल पातळी

५३६.१४ मीटर

बंधाऱ्याच्या खालची पातळी

५४०.१४ मीटर

धोक्याची पातळी

५४५.८३ मीटर

एप्रोच पूल पातळी

५४९.५७ मीटर

पूलाचा आधार

५५६.९७ मीटर

क्षमता

१२९ (०.१२९ टीएमसी)

दरवाज्याचा प्रकार

उभा दरवाजा

दरवाज्याचा आकार

15 मीटर x 4.50 मीटर

दरवाजाचे वजन

प्रत्येकी 37 टन, एकुण वजन १८५ टन

दरवाजांची संख्या

प्रकार

सेंट्रल ड्राईव्ह वायर रोप ड्रम टाईप

क्षमता

७५ टन

मोटर

क्रॉम्प्टन ग्रीव्हज १५ एचपी

रिडक्शन गिअर बॉक्स

प्रमुख गुणोत्तर ६०:१

वेग

0.5 मीटर प्रति मिनिट

बंधाऱ्याचे दरवाजे

आकार १५ मीटर x १.१२५ मीटर

४ (१ सेट) एकुण वजन ५२ टन

आधार

२० टन (मोटर १ ७.५ एचपी , २ मोटारी ३ एचपी)

एकुण वापरण्यात आलेले स्टील

७२१.१० टन

प्रकल्प प्रारंभ

०२/०१/२०१४

पुर्ण झाल्याची तारीख

१७/११/२०१५

फायदे :

  • सर्व पाच दरवाजे उघडल्यानंतर पूराची पातळी १.०८ मीटरने कमी झाली आहे. यामुळे पूर नियंत्रणात येण्यास मदत होते. 
  • वाढली.नदीची गती
  • टीएमसी आहे ज्यामुळे बीईजी, सीओईपी आणि बोट क्लब यांना नौकाविहारासाठी मदत होईल.१२९ बंधाऱ्याची क्षमता ०.
  • भविष्यात वीजनिर्मितीसाठी मदत होईल. 

bundgarden image bundgarden image bundgarden image bundgarden image