पुणे बीआरटीची पार्श्वभूमी
- पुणे शहराला ‘जेएनएनयुआरम’अंतर्गत 68.80 किलोमीटर लांब रस्ता बीआरटीसाठी विकसित करण्यास परवानगी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी 1013.97 कोटी रुपयांचा खर्च मंजुर झाला होता. रस्ते विभागाने सुरुवातीला खाली दोन बीआरटी मार्गांचा विकास केला आहे.
- विश्रांतवाडी-आळंदी
- येरवडा- वाघोली मार्ग
विस्तार योजना
रेनबो नेटवर्कचे सुरुवातीचे काम नागरिकांच्या पसंतीस उतरल्यानंतर महानगरपालिकेने आता आणखी मार्गांवर जलद बस वाहतूक यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला. पिंपरी-चिंचवडमधील मार्गदेखील तयार झाले आहेत. यानंतर आता पुणे मेट्रो रिजनमध्येदेखील रेनबो नेटवर्कचा विस्तार केला जाणार आहे.