गिर्यारोहक भिंत
पुणे शहरातील प्रभाग क्रमांक ३६ मध्ये शिवाजीनगर गावठाण परिसरात पुणे महानगरपालिकेने कृत्रिम गिर्यारोहक भिंत (आर्टिफिशियल क्लाईबिंग वॉल) उभी केली आहे. ही गिर्यारोहक भिंत पुणे महानगरपालिकेच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून श्री. शिवाजी व्यायाम मंडळास कराराने सन २०१२ मध्ये चालविण्यास देण्यात आलेली होती. सध्या या गिर्यारोहक भिंतीचा ताबा क्रीडा विभागाकडे असून हा प्रकल्प चालविण्यास देण्याकरीता नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.