क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन यंत्रणा(सीसीटीव्ही)

क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन यंत्रणा(सीसीटीव्ही) पुणे सिटी सर्वेलन्स अर्थात पीसीएसअंतर्गत संपुर्ण पुणे शहरात सीसीटीव्हीमार्फत पाळत ठेवली जाते. या यंत्रणेमुळे खाली नमूद केलेले फायदे होतात- - पुणे पोलिसांना शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत - तपासकार्यादरम्यान मदत - वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा - गुन्हेगारी कृत्यांचा तपास करणे तसेच या गुन्ह्यांना आळा घालणे

पुणे पोलिसांना शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत – चोवीस तास लाईव्ह व्हिडिओ फीड देणाऱ्या या यंत्रणेत स्वयंचलित पद्धतीने इशारा मिळण्याचीदेखील सोय आहे. यामुळे पोलिसांना प्रत्यक्ष घटनास्थळी काय होत आहे याची माहिती मिळते व वेळेत कारवाई करण्यास मदत होते.

तपासकार्यादरम्यान मदत- या यंत्रणेमार्फत परिसराचे सातत्याने रेकॉर्डिंग केले जाते. यामुळे पोलिसांना भूतकाळात घडलेली घटनादेखील सहजपणे पाहता येते.

वाहतूक व्यवस्थापनात मदत- यंत्रणेत अंतर्भूत व्हिडिओ अॅनालिटीक्स सुविधेमुळे एखाद्याने वाहतुकीचे नियम मोडल्यास स्वयंचलित अलर्ट मिळतो.

गुन्हेगारी कृत्यांचा तपास करणे तसेच या गुन्ह्यांना आळा घालणे- सातत्याने सुरु असणारे व्हिडिओ रेकॉर्डिंग, गर्दीचा जमाव, संशयास्पद हालचाल किंवा वस्तू आढळून आल्यास अलर्ट, नंबर प्लेटची ओळख पटविण्याची यंत्रणा इत्यादी गोष्टींमुळे पोलीसांना गुन्हेगारी कृत्यांबाबत चौकशी करुन त्याला आळा घालण्यास मदत होते.

पार्श्वभूमी: पुणे शहर पोलीसांतर्फे महाराष्ट्रातील पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील सुमारे ७९० चौरस किलोमीटर विस्तारलेल्या अधिकारक्षेत्रात कायद्याची अंमलबजावणी केली जाते. पुणे पोलीस ही महाराष्ट्र पोलीसांची शाखा आहे. सध्याचे पुणे आयुक्तालय १ जुलै १९६५ साली अस्तित्वात आले. पुणे शहर पोलीस विभागाचे काम ३३ पोलीस स्थानकांमार्फत चालते. याशिवाय, शहरातील रस्त्यांवरील वाहतूक नियोजनाची जबाबदारी या विभागाकडे आहे.

पोलिस आयुक्तालयाचे दोन विभाग असतात- उत्तर विभाग आणि दक्षिण विभाग. प्रत्येक विभागाच्या प्रमुखपदी अतिरिक्त पोलीस आयुक्ताची नेमणूक केली जाते. प्रत्येक विभाग दोन परिमंडळांमध्ये विभागलेला असतो; म्हणून पुणे शहरात शहरात चार परिमंडळे आहेत. उदा., परिमंडळ-१, परिमंडळ-२, परिमंडळ-३ आणि परिमंडळ-४. या परिमंडळांची जबाबदारी पोलीस उपायुक्ताकडे दिली जाते. त्यानंतर प्रत्येक परिमंडळाचे दोन किंवा तीन उप-विभाग केले जातात. सहाय्यक पोलीस आयुक्ताकडे या उप-विभागांची जबाबदारी दिली जाते.

क्र.

विभाग

परिमंडळ

उप-विभाग

1

दक्षिण

परिमंडळ- १

शहर

डेक्कन

परिमंडळ- २

विश्रामबाग

स्वारगेट

 

लष्कर

2

उत्तर

परिमंडळ-३

पिंपरी

चतुःश्रुंगी

परिमंडळ-४

खडकी

वानवडी

पुणे पोलीस आयुक्तालयाचे एकुण ९ उपविभाग पडतात. प्रत्येक उपविभागाअंतर्गत दोन ते सहा पोलीस स्थानके असतात. पुणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दोन संरक्षण कॅन्टॉनमेंट बोर्डाच्या परिसरासह एकुण ३३ पोलीस स्थानके आहेत. प्रत्येक पोलीस स्थानकाचा प्रमुख हा वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर असतो. एका पोलीस स्थानकांतर्गत तीन ते चार पोलीस चौकी असतात. पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत १०७ पोलीस चौकी आहेत व एपीआय/पीएसआय दर्जाचा अधिकारी या प्रत्येक पोलीस चौकीचे नेतृत्व करत असतो. यंत्रणेचे लाभार्थीः

· पुणे महानगरपालिका (पीएमसी)

· पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी)

· खडकी कँटोंमेंट बोर्ड (केसीबी)

· पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड (पीसीबी)

· विमानतळे, रेल्वे

· शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे, शाळा, हॉटेल्स, रुग्णालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणे

· आर्थिक संस्था, कॉर्पोरेट हाऊस

· सामान्य नागरिक

 

दृष्टीक्षेपात आयपीवर आधारित आऊटडोर सुरक्षा कॅमेराची पीसीएस यंत्रणा शहरात सर्वत्र बसविण्यात आली आहे. विविध तैनात कॅमेऱ्यांमार्फत मिळालेला व्हिडिओ डेटा हा डेटा सेंटरमध्ये साठविला जातो. सर्व पोलीस स्थानके, पोलीस आयुक्त कार्यालयातील कमांड कंट्रोल सेंटर्स, पुणे महानगरपालिका कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यालयांमधून या डेटावर लक्ष ठेवले जाते. - या यंत्रणेत १३६३ कॅमेरांचा समावेश असतो. - १०६८ फिक्स बॉक्स कॅमेऱ्यांचा समावेश - २१७ पॅन-टिल्ट-झूम(पीटीझेड) कॅमेरे - ७८ ऑटोमॅटिक नंबरप्लेट रिकग्निशन(एएनपीआर) हे सर्व कॅमेरे एकुण ४१८ ठिकाणी बसविण्यात आले असून त्यात एनपीआर कॅमेऱ्यांचा समावेश आहे. या कॅमेऱ्यांमार्फत मिळणारे लाईव्ह फीड सेव्ह केले जाते व ही माहिती डेटा सेंटरमध्ये पाठवली जाते. डेटा सेंटरमध्ये सुमारे ९० दिवसांपर्यंत ही माहिती साठविण्याची सोय असून एएनपीर कॅमेऱ्यांमधून मिळणारी लाईव्ह फीडची माहिती १८० दिवसांपर्यंत साठविण्याची क्षमता आहे. यंत्रणेमार्फत दिसणाऱ्या लाईव्ह फीडवर लक्ष ठेवण्यासाठी खालील ठिकाणी आदेश नियंत्रण आणि देखरेख केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत- - पोलीस आयुक्त कार्यालय : येथील नियंत्रण व देखरेख केंद्रातून एकावेळी १५० कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवता येते. - पुणे महानगरपालिका येथील देखरेख केंद्रातून एकावेळी ६० कॅमेऱ्यांमार्फत लक्ष ठेवता येते. - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील देखरेख केंद्रातून एकावेळी २५ कॅमेऱ्यांमार्फत लक्ष ठेवता येते. - जिल्हाधिकारी कार्यालय येथून एकावेळी १० कॅमेऱ्यांमार्फत लक्ष ठेवण्याची सोय

आहे. - पोलीस आयुक्तायलयाच्या नेतृत्वाखालील दोन विभागीय कार्यालयांमध्ये असणाऱ्या देखरेख केंद्रातून त्या क्षेत्रात बसविण्यात आलेल्या एकुण कॅमेऱ्यांपैकी १० टक्के कॅमेऱ्यांमार्फत लक्ष ठेवता येते. - विभागीय कार्यालयांच्या नेतृत्वाखालील चार परिमंडळ कार्यालयातील देखरेख केंद्रातून त्या क्षेत्रात बसविण्यात आलेल्या एकुण कॅमेऱ्यांपैकी १० टक्के कॅमेऱ्यांमार्फत लक्ष ठेवता येते. - शहरातील ४० पोलीस स्थानकांमध्ये असणाऱ्या देखरेख केंद्रातून संबंधित पोलीस स्थानकाच्या अधिकारक्षेत्रात बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांपैकी ४० टक्के कॅमेऱ्यांमार्फत लक्ष ठेवता येते.

यंत्रणेतील घटकांचा तपशीलः १. नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी – शहरात पाळत ठेवण्यासाठी वापरात असलेली सर्व उपकरणे विशेष नेटवर्कमार्फत जोडण्यात आलेली आहेत. याद्वारे मिळणारे व्हिडिओ फीड्स डेटा सेंटर आणि पाहणी केंद्रात २४X7 उपलब्ध असतात.

२. डेटा सेंटर आणि एप्लिकेशन्स- हाय-एंड सर्व्हर सुविधा आणि भव्य स्टोरेज क्षमता असणारे डेटा सेंटर एप्लिकेशन सर्व्हर्ससह स्थापन करण्यात आले आहे. सर्व कॅमेऱ्य़ांमध्ये तसेच देखरेख एप्लिकेशन्समध्ये रेकॉर्ड झालेले व्हिडिओ या सेंटरमध्ये साठविले जातात.

३. नियंत्रण व देखरेख केंद्रे- पोलीस आयुक्तालय कार्यालयात नियंत्रण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय, विभागीय पोलीस उपायुक्त कार्यालय, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस स्थानकांमध्ये संबंधित क्षेत्रावर थेट लक्ष ठेवण्यासाठी लाईव्ह व्हिडिओ फीड्स उपलब्ध करुन देणारी देखरेख केंद्रे उपलब्ध आहेत. पोलीस आयुक्त कार्यालयाती नियंत्रण केंद्रामध्ये

व्हिडिओ-वॉल देखील आहे. इतर देखरेख केंद्रांमध्ये व्हिडिओच्या थेट व प्रभावी निरीक्षणासाठी टीव्ही संच तसेच वर्कस्टेशन्स आहेत.

४. संयुक्तपणे देखरेख- खासगी आणि सार्वजनिक संस्थांच्या देखरेख प्रणाली पीसीएस यंत्रणेशी लवकरच जोडण्यात येतील. या ठिकाणांमध्ये काही आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास प्रसंगाचे लाईव्ह फीड्स उपलब्ध असतील.

५. हेल्प डेस्क आणि सुविधा व्यवस्थापन प्रणाली- संपुर्ण पायाभूत सुविधांची देखरेख व देखभाल करण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करण्यात आली असून यासाठी मनुष्यबळाची मदत घेतली जाते. त्वरित प्रतिसाद देणाऱ्या हेल्प डेस्कमुळे कोणताही तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्त केला जातो व पीसीएस यंत्रणा पुर्वपदावर येईल याची तरतूद केली जाते.

यंत्रणेचा सुयोग्य वापर १. खालील प्रसंगांवेळी कायदा व सुव्यवस्था राखणे- स्थानिक गोंधळ, दंगली, गर्दी जमाव, सार्वजनिक उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम, आगीसंदर्भातील प्रसंग २. गुन्हेसंदर्भातील तपास- घरफोडी, दरोडा, चोरी, लोक तसेच वाहनांची ओळख पटविणे, दुकानदारांची / स्थानिक लोकांच्या छळवणूकीचे प्रकार, मारामारी, खुनाचा तपास ३. वाहतूक नियंत्रण - वाहतुकीचा मार्ग, चौकातील गर्दी, वाहतूक जाळे, वाहतूक नियमांचे उल्लंघन, हिट-आणि-रन केसेस व रस्ते अपघातादरम्यान झालेल्या प्रसंगाची माहिती मिळवण्यासाठी कॅमेऱ्याद्वारे मिळणाऱ्या लाईव्ह फीडचा उपयोग होऊ शकतो.

Pmc Care Master Tag: