घनकचरा व्यवस्थापन विभाग

Select Initiatives

संपर्कासाठीची उपक्रम

संपर्कासाठीचे उपक्रम

स्वच्छ, सुंदर आणि हरित पुण्यासाठी पुणे शहरातील नागरिक सतत मनपासून सक्रिय सहभाग नोंदवितात. नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटीजच्या मोहल्ला समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या प्रभाग आणि शहर स्तरावरील मोहल्ला समितीच्या बैठकीत पुण्यातील नागरिक रचनात्मक पद्धतीने सहभागी होतात. या बैठका दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आयोजित केल्या जातात. या बैठकांमध्ये धोरणात्मक बाबी आणि त्यांच्या अंमलबजावणी संदर्भातील निर्णय घेतले जातात.

पुणे महानगरपालिकेने हाती घेतलेल्या शून्य कचरा मोहिमेमध्ये नागरिकांना सहभागी करून त्यांना करता येण्याजोग्या आवश्यक बाबींची  माहिती देण्यात येते.

नागरिकांनी त्यांच्या वागणूकीमध्ये बदल करून महानगरपालिकेच्या उपक्रमाला सहकार्य करावे यासाठी आवाहन करणारे लघुपट, कमानी किंवा प्रवासी वाहनांमधून स्वयंसेवकांद्वारे माहिती देऊन जनजागृती करण्यात येते. मोहल्ला समितीच्या बैठकीत पपेट शो चे आयोजन करण्यात येते आणि माहिती देणार्‍या सीडीज दाखविण्यात येतात.

स्थानिक पातळीवरील कार्यक्रम: हॉटेल मालक, शहरातील नागरिकांना ई-वेस्टबाबत माहिती देणार्‍या कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. दर गुरुवारी मोहल्ला समितीच्या बैठकांचे आयोजन करण्यात येते. शाळा आणि महाविद्यालय स्तरावर स्वच्छतेसंदर्भातील रॅलीचे आयोजन करण्यात येते.