Projects

Select Projects

कमिन्स उड्डाणपूल बांधकाम

उड्डाणपूलाची गरज

वारजे रस्ता हा शहरातील सर्वाधिक गर्दीच्या रस्त्यापैकी एक आहे. वारजे, माळवाडी, शिवणे आदी परिसराचा वेगाने विकास झाल्याने युनिव्हर्सल चौक आणि कमिन्स कॉलेज चौकात सातत्याने वाहतूककोंडी होते. या समस्येवर मात करण्यासाठी कमिन्स कॉलेज चौक आणि युनिव्हर्सल चौकामध्ये उड्डाणपूल बांधण्याची आवश्यकता आहे.

ठळक वैशिष्ट्ये

युनिव्हर्सल चौक आणि कमिन्स कॉलेज चौकादरम्यान दोन स्वतंत्र चार पदरी उड्डाणपूल. उड्डाणपूलाच्या बाजूला ५.१ मीटर रुंदीचा पर्यायी रस्ता आणि रस्त्याच्या मध्यभागी दुपदरी बीआरटीएस मार्ग.  कमिन्स चौक आणि युनिव्हर्सल चौक उड्डाणपूलाची लांबी अनुक्रमे ५४९ मीटर आणि ५२२ मीटर आहे. त्यापैकी पूलाची लांबी अनुक्रमे ३३० मीटर आणि २५५ मीटर आहे. उड्डाणपूलाची रुंदी मध्यवर्ती भागात १५.८० मीटर आणि जेथे जोडले जातात त्या दोन्ही बाजूला ७.९ मीटर आहे. काम सुरू करण्याची तारीख २२ ऑक्टोबर २०१२ आहे आणि त्यापुढे ३० महिन्यात अर्थात २१ एप्रिल २०१५ पर्यंत काम पूर्ण करायचे होते. कालमर्यादा ३१ ऑक्टोबर २०१६ पर्यंत वाढवून देण्यात आली असून आता काम

पूर्ण करण्याची प्रस्तावित तारीख ३१ मे २०१७ आहे. उड्डाणपूलाची एकूण किंमत ४४.९१ कोटी असून ४१.३७ कोटींमध्ये कंत्राट देण्यात आले आहे. ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत १५.०५ कोटी रुपयांची आर्थिक प्रगती झाली आहे.

उड्डाणपूलाचे लाभ

  • जवळपास ८० टक्के वाहने उड्डाणपूलाचा वापर करतील. त्यामुळे वेळ, इंधन वाचेल आणि हवेचे प्रदूषण होणार नाही. उड्डाणपूलाचा वापर करून प्रवास करणार्‍या वाहनांचा वेळ ५ ते १० मिनिटांनी वाचेल.
  • वाहतूक कमी झाल्याने पर्यायी रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होईल.

बीआरटीएससाठी स्वतंत्र मार्गिका असल्याने अशा बसेसचा वेळ आणि इंधन वाचेल तसेच बसेस तसेच पर्यायी रस्त्यावरील वाहने सुरक्षितरित्या पुढे जातील.