जलद दुवे
महापालिकेने 74 ऍम्ब्युलन्समध्ये उपलब्ध केली ऑक्सीजनची सुविधा, तातडीच्या वेळी 'या' नंबरवर करा कॉल, जाणून घ्या.
वाचा सविस्तर
अतिरिक्त बिल आल्यास : ०२० - २५५० २११५
खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात बेड मिळणेबाबत : ०२० - २५५० २११०
स्वयंसेवक व्हा
मदत कक्ष संपर्क
बेड व्यवस्थापन
राष्ट्रीय कॉल सेंटर : ०११ - २३९७८०४६
हेल्पलाईन : १०४
पुणे नियंत्रण कक्ष : ०२० - २६१२७३९४
Array
Array
नवीन काय आहे
•मिडल ईस्ट / युरोपियन देशांमधून आगमन करणार्या प्रवासानकरता मार्गदर्शक तत्त्वे (22/12/2020)
•पुणे महानगरपालिका क्षेत्रामधील प्रतिबंधित क्षेत्राचे पुनर्विलोकन सुधारणा आदेश (04/11/2020).
• शहरातील दुकानांची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 - पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार (09/10/2020).
•३१ डिसेंबर, २०२० व नूतन वर्ष मार्गदर्शक सूचना(30/12/2020).
•Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown. (MISSION BEGIN AGAIN)(27/11/2020).
• महाराष्ट्र सरकारचा 23 नोव्हेंबर रोजीचा ऑर्डर (मिशन बिगेनअगेन ) (भारतीय विमानतळ प्राधिकरण)
• Easing of Restrictions and phase-wise opening of lockdown (Mission Begin Again)
•राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदशगक सूचना निर्गमित करण्याबाबत(10/11/2020).
• Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown. (MISSION BEGIN AGAIN)(3/11/2020)
• Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown. (MISSION BEGIN AGAIN)(14/10/2020)
कोरोना जागरूकता माहिती
| राष्ट्रीय कॉल सेंटर : ०११ - २३९७८०४६ | हेल्पलाईन : १०४ | पुणे नियंत्रण कक्ष : ०२० - २६१२७३९४ |
कोरोना विषाणूसंबधी माहिती आणि घ्यावयाची काळजी
कोरोना विषाणू-सर्वसाधारण माहिती
कोरोना हे एका विषाणू समूहाचे नाव आहे. हे विषाणू भारताला पूर्वीपासून माहित आहेत. २००३ मध्ये आढळलेला सार्स हा आजार किंवा २०१२ मध्ये आढळलेला मर्स हा आजार हे सुद्धा कोरोना विषाणूमुळे होणारे आजार आहेत. परंतु डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात सुरु झालेल्या या उद्रेकामध्ये जो कोरोना विषाणू आढळला तो यापूर्वीच्या कोरोना विषाणू पेक्षा वेगळा आहे. म्हणून त्याला नॉवेल अर्थात नवीन कोरोना विषाणू असे संबोधण्यात येते.जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास 'कोविड-१९' असे नाव दिले आहे.
कोरोनाचे मूळस्थान:
कोरोना हा प्राणी जगतातून मानवाकडे आलेला विषाणू आहे. तो मुख्यत्वे वटवाघळामध्ये आढळतो. बेसुमार जंगलतोड, वाढते शहरीकरण, कच्चे मांस खाण्याची सवय इत्यादी कारणांमुळे प्राणी जगतातील सूक्ष्मजीव मानवामध्ये प्रवेश करतात.
कोरोना विषाणू आजाराची लक्षणे
ही मुख्यत्वे श्वसन संस्थेशी निगडीत असतात. ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे,ताप,न्युमोनिया,काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात.
० ते ५ वर्ष वयोगट | ५ वर्षावरील वयोगट |
|
|
-
सदर आजाराच्या जनजागरणाकरिता महानगरपालिकेमार्फत पोस्टर्स, बनर्स छपाई करुन घेण्यात आले असुन सदर पोस्टर्स महत्वाच्या ठिकाणी निर्गमित करण्यात येत आहे. सदर आजाराबाबत वर्तमानपत्रात माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे व तसेच विविध रेडिओ चनेलवरून या आजाराची माहिती प्रसारित करण्यात येत आहे.
-
नवीन कोरोना विषाणू सद्यस्थिती आणि उपाययोजना :
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा नागरिकांचे शंकानिरसन
ज्या अर्थी, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ [अ] नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. आणि ज्या अर्थी, आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत करोना विषाणू संसर्ग बाधित रूग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत असल्याने करोना विषाणूचे संशयित रुग्ण पुणे शहरातही आढळून आल्याचे निदर्शनास आलेले आहे.परदेश दौऱ्यावरून आलेल्या नागरिकांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे व त्यामध्ये १४ दिवसांसाठी खालील सूचनांचे पालन आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये पालन करणे या आदेशान्वये अनिवार्य करण्यात येत आहे.
घरात विलगीकरण कक्ष करण्याची सूचना
घरात विलगीकरण केलेल्या व्यक्तीने हवेशीर आणि वेगळी खोली ज्याला संडास बाथरूम जोडलेले आहे अशा खोलीमध्ये रहावे. जवळचे नातेवाईक जर त्या खोलीमध्ये राहणार असतील तर त्यांनी रूग्णापासून कमीत कमी एक मिटर अंतरावर रहावे.
परदेश दौऱ्यावरून आलेल्या नागरिकांनी स्वत:हून शासकीय आरोग्य यंत्रणेस संपर्क साधून माहिती कळविणे बंधनकारक आहे.
परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर १४ दिवस १०४ क्रमांकावर स्वत:ची आरोग्य विषयक माहिती कळविणे बंधनकारक राहील.
त्यामध्ये कोरोना सदृश आजाराची प्राथमिक लक्षणे आढळल्यास स्वत:हून नजीकच्या शासकीय रूग्णालयामध्ये तपासणी करावी व आवश्यकतेनुसार भरती व्हावे.
अशा व्यक्तीने घरातील वृध्द, गर्भवती स्त्री, लहान मुले व प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये.
अशाव्यक्तीने घरातील त्यांचा वावर सिमीत ठेवावा
अशा व्यक्तींनी त्यांच्या पूर्व नियोजीत सभा, न्यायालयीन कामकाज इ. बाबत वेळीच संबंधित प्राधिकारी यांना कळवून सदर सभांना न्यायालयीन कामकाजांना गैरहजर राहणार असल्याची पूर्व परवानगी घ्यावी. अशा व्यक्तीने अल्कोहोलयुक्त हॅण्ड सॅनीटायझर किंवा साबण आणि पाण्याने वारंवार व्यवस्थित हात धुवावेत. अशा व्यक्तीने वापरलेले ताट, वापरलेले पाण्याचे ग्लास, कप, जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरूण, गादी आणि इतर दैनंदिन वापरातील घरगुती वस्तू घरातील इतर व्यक्तींना वापरण्यास देऊ नये. अशा व्यक्तींनी पूर्ण वेळ सर्जीकल मास्कचा वापर करावा. मास्क दर ६ ते ८ तासांनी बदलावा आणि वापरलेल्या मास्कची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी. डिस्पोजेबल मास्क पुन्हा वापरू नयेत. अशा व्यक्तींनी / त्यांची सुश्रुषा करणाऱ्या व्यक्तीने / निकट सहवासीतांनी घरातील सुश्रूषे दरम्यान वापरलेले मास्क ५ टक्के ब्लिच सोल्यूशन किंवा १ टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणामध्ये निर्जतुक करून त्याची जाळून विल्हेवाट लावावी. वापरलेला मास्क हा जंतुसंसर्गयुक्त समजावा.
घरी विलगीकरण केलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णाच्या नातेवाईकांसाठी सूचना
एकाच नातेवाईकाने अशा व्यक्तीची सुश्रुषा करावी. अशा व्यक्तींच्या शरीराशी थेट संपर्क येणे टाळावे आणि त्यांचे वापरलेले कपडे झटकू नये. घरातील विलगीकरण कक्षाची स्वच्छता करताना किंवा अशा व्यक्तींचे वापरलेले कपडे हाताळताना डिस्पोजेबल ग्लोव्हजचा वापर करावा. डिस्पोजेबल ग्लोव्हज काढल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.
नातेवाईक आणि इतरांना अशा व्यक्तींना भेटून देऊ नये. घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेल्या व्यक्तींना जर कोविड-१९ बाबत लक्षणे आढळून आली तर त्याच्या निकट संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना १४ दिवस घरातील विलगीकरण कक्षात ठेवावे व पुढील १४ दिवस किंवा अशा व्यक्तीचा प्रयोगशाळा रिपोर्ट निगेटीव्ह येईपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा.
घराच्या स्तरावरील विलगीकरण कक्षाची स्वच्छता
घरात केलेल्या विलगीकरण कक्षातील असलेल्या व्यक्तीच्या खोलीमधील वारंवार हाताळल्या जाणाऱ्या वस्तूंचे [फर्निचर, बेड फ्रेम, टेबल] १ टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जंतुकीकरण करावे. शौचालयाची स्वच्छता आणि अशा व्यक्तींचे संपर्कात आलेले कपडे, अंथरूण पांघरूण हे घरातील डिटर्जंट वापरून वेगळे स्वच्छ धुवून वाळवावे. निर्जंतुकीकरण घरगुती ब्लिच किंवा घरगुती फिनायलने करावे. उपरोक्त सूचनांचे तंतोतंत पालन करणेत यावे अन्यथा नियमानुसार कारवाई करुन संस्थात्मक विलगीकरण कक्षात स्थलांतरीत करणेत येईल, याची गांभीयपूर्वक नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
राज्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
घरोघरी सर्वेक्षणाचे कामकाज सुरु
सद्यस्थितीत करोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधाकरिता ( कंटेनमेंट प्लॅन ) अंतर्गत करावयाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून हे सर्वेक्षण केले जाणार असून पुणे मनपा परिसरात घरोघरी जाऊन मनपातील पथके आजपासून हे सर्वेक्षण करणार आहेत. ३० कर्मचाऱ्यांचे १ पथक अशी सुमारे १२५ पथके तयार करण्यात आली असून या पथकात आरोग्य निरीक्षक,समूह संघटिका,विभागीय आरोग्य निरीक्षक,वैद्यकीय अधिकारी,अशा विविध पदनिहाय कर्मचारी व अधिकारी यांचा समावेश आहे, संपूर्ण शहरात विशेषतः प्रादुर्भाव असलेल्या भागात, तसेच गेल्या महिनाभरापासून परदेशातून पुण्यात आलेल्या देशी- परदेशी नागरिकांच्या घरी जाऊन भेटी घेणे,कोरोना संदर्भात माहिती देणे,कोरोना बाबत लक्षणे आढळल्यास, डॉ, नायडू रुग्णालयात तपासणी करणे, वैद्यकीय सल्ला,मार्गदर्शन घेणे,विलगीकण म्हणजे काय?घरी १४,दिवस विलगीकरण कसे करावे याचबरोबर मनपाचे वतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजना याबाबत माहिती देऊन जनजागृती केली जाणार आहे.
-
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय आणि मार्गदर्शक तत्त्वे
भारत सरकार द्वारे कोरोना संबंधित दिली जाणारी अधिकृत माहिती पाहण्यासाठी येथे क्लीक करा
| राष्ट्रीय कॉल सेंटर : ०११ - २३९७८०४६ | हेल्पलाईन : १०४ | पुणे नियंत्रण कक्ष : ०२० - २६१२७३९४ |
घरात विलगीकरण कक्ष करण्याची सूचना
घरात विलगीकरण केलेल्या व्यक्तीने हवेशीर आणि वेगळी खोली ज्याला संडास बाथरूम जोडलेले आहे अशा खोलीमध्ये रहावे. जवळचे नातेवाईक जर त्या खोलीमध्ये राहणार असतील तर त्यांनी रूग्णापासून कमीत कमी एक मिटर अंतरावर रहावे. परदेश दौऱ्यावरून आलेल्या नागरिकांनी स्वत:हून शासकीय आरोग्य यंत्रणेस संपर्क साधून माहिती कळविणे बंधनकारक आहे. परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर १४ दिवस १०४ क्रमांकावर स्वत:ची आरोग्य विषयक माहिती कळविणे बंधनकारक राहील. त्यामध्ये कोरोना सदृश आजाराची प्राथमिक लक्षणे आढळल्यास स्वत:हून नजीकच्या शासकीय रूग्णालयामध्ये तपासणी करावी व आवश्यकतेनुसार भरती व्हावे. अशा व्यक्तीने घरातील वृध्द, गर्भवती स्त्री, लहान मुले व प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये. अशाव्यक्तीने घरातील त्यांचा वावर सिमीत ठेवावा.
अशा व्यक्तींनी त्यांच्या पूर्व नियोजीत सभा, न्यायालयीन कामकाज इ. बाबत वेळीच संबंधित प्राधिकारी यांना कळवून सदर सभांना न्यायालयीन कामकाजांना गैरहजर राहणार असल्याची पूर्व परवानगी घ्यावी. अशा व्यक्तीने अल्कोहोलयुक्त हॅण्ड सॅनीटायझर किंवा साबण आणि पाण्याने वारंवार व्यवस्थित हात धुवावेत. अशा व्यक्तीने वापरलेले ताट, वापरलेले पाण्याचे ग्लास, कप, जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरूण, गादी आणि इतर दैनंदिन वापरातील घरगुती वस्तू घरातील इतर व्यक्तींना वापरण्यास देऊ नये. अशा व्यक्तींनी पूर्ण वेळ सर्जीकल मास्कचा वापर करावा. मास्क दर ६ ते ८ तासांनी बदलावा आणि वापरलेल्या मास्कची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी. डिस्पोजेबल मास्क पुन्हा वापरू नयेत. अशा व्यक्तींनी / त्यांची सुश्रुषा करणाऱ्या व्यक्तीने / निकट सहवासीतांनी घरातील सुश्रूषे दरम्यान वापरलेले मास्क ५ टक्के ब्लिच सोल्यूशन किंवा १ टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणामध्ये निर्जतुक करून त्याची जाळून विल्हेवाट लावावी. वापरलेला मास्क हा जंतुसंसर्गयुक्त समजावा.
भारताचा कोरोना डॅशबोर्ड
भारत सरकारद्वारे कोरोनासंदर्भात देण्यात येत असलेली अद्ययावत मिळविण्यासाठी भारत सरकारचे हे अधिकृत संकेतस्थळ वापरा. या संकेतस्थळावर कोरोनासंदर्भातील देशाच्या सद्यस्थितीची माहिती दर चार तासांनी माहिती अद्ययावत करण्यात येत आहे. संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Ministry of Health and Family Welfare
इतर दुवे :
Orders / आदेश
• नागरिकांमध्ये मास्क वापराबाबत जागृकता निर्माण करण्याबाबत.
• जिम (व्यायामशाळा) सुरु करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना २३.१०.२०२०
• संगणकावर सॅनिटाईझर फवारणी न करण्याबाबत.
• सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२० मार्गदर्शक सूचना
• वित्त विभाग, शाशन निर्णय क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.४/व्यय-९, दि.२९.५.२०२०
• शहरातील दुकानांची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 - पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार.
• कोविड - १९ प्रतिबंध व नियंत्रण याबाबतचे आदेश
• पुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (CONTAINMENT ZONE) 03-09-2020
• पुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (CONTAINMENT ZONE) 01-07-2020
• पुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (CONTAINMENT ZONE) 24-06-2020
• पुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (CONTAINMENT ZONE) 03-06-2020
• पुणे महानगरपालिकेतील प्रतिबंधित क्षेत्र (CONTAINMENT ZONE) 17-05-2020
• पुणे महानगरपालिकेतील प्रतिबंधित क्षेत्र (CONTAINMENT ZONE) 10-05-2020
• पुणे महानगरपालिकेतील सूक्ष्मप्रतिबंधित क्षेत्र (CONTAINMENT ZONE) 17-08-2020
• लॉकडाऊन सुधारीत आदेश 3 ऑगस्ट २०२०
• लॉकडाऊन सुधारीत आदेश ३१ जुलै २०२०
• लॉकडाऊन सुधारीत आदेश १८ जुलै २०२०
• लॉकडाऊन कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना कंपनी मध्ये येणे व जाने करिता वाहन पास देणेबाबत
• लॉकडाऊन सुधारीत आदेश १३ जुलै २०२०
• महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम २०२० अन्वये पूर्ण पुणे शहर सील
• पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून आवाहन
• पुणे महानगरपालिका क्षेत्रात बिगर अत्यावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याबाबत घ्यावयाची दक्षता
• परदेशातून आलेल्या नागरिकांना / डॉक्टर्सना आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे.
शहरातील रुग्णालयातील डॉक्टर्सना प्रशिक्षण
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिका विविध स्तरांवर मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबवत आहे. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावीरित्या वापर केला जात आहे.या अनुषंगाने पुणे मनपामार्फत मा.शान्तनू गोयल,अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) यांच्यासह आरोग्य विभागाचे डॉ.संजीव वावरे व माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख श्री.राहुल जगताप यांनी शहरातील रुग्णालयातील डॉक्टर्सना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामध्ये कोरोनासंदर्भात शासनाला माहिती पाठवताना वापरावयाच्या रिपोर्टींग फॉरमॅट्स संबंधी सूचना, Integrated Disease Surveillance Plan (एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प) अंतर्गत शासनाला पाठवावयाची रुग्णांसंबंधी व अन्य आवश्यक माहिती कशी पाठवावी याची माहिती, तसेच ही माहिती पाठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचा वापर कसा करावा यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी समाविष्ट होत्या.
हे प्रशिक्षण एकूण कार्यपद्धतीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी महत्त्वाचे ठरणारे आहे.
भारतीय सैन्य दलाच्या वतीने पुणे महानगरपालिकेस मानवंदना!
कोरोना विषाणू प्रादुर्भाव विरोधात यशस्वी लढा देणाऱ्या पुणे महापालिकेस भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या वतीने अर्थात भारतीय सैन्य दलाच्या वतीने आज सन्मानपूर्वक मानवंदना देण्यात आली. पुणे मनपा अधिकारी,कर्मचारी ,डॉक्टर्स,आरोग्यसेवक,अशा विविध पातळीवर लढा देणाऱ्या सर्वांचा सन्मान व मानवंदना देण्याचा सोहळा मनपाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ संपन्न झाला. कार्यक्रमप्रसंगी प्रथमतः कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या व्यक्तींना उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली. कोरोना विषाणू विरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना भारतीय सैन्यदल मानवंदना देत असल्याचे चित्र स्वरूप याप्रसंगी मा.महापौर मुरलीधर मोहोळ व मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांना सन्मानार्थ प्रदान करण्यात आले. भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी आणलेला केक यावेळी सफाई कर्मचारी व डॉ,संजीव वावरे यांच्या हस्ते केक कापून सैन्य दलाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या व उपस्थितांना मिठाई वाटप केले.
मा.महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मा,ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांना मनपा कॉफी टेबल बुक व मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनीही पुस्तक भेट दिले. मा.रुबल अगरवाल,अति.मनपा आयुक्त यांनी मा,ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांना भारतीय राष्ट्रध्वज प्रदान केला.याप्रसंगी मार्गदर्शन करताना सब एरिया पुणे चे चीफ स्टेशन कमांडर,ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांनी सांगितले कि, कोरोना विषाणू प्रादुर्भाव विरोधात देण्यात येत असलेला लढा अत्यंत महत्वपूर्ण आहे,या लढ्यात योगदान देणारे योध्ये,शासन यंत्रणा,स्थानिक स्वराज्य संस्थातील सफाई कर्मचारी,डॉक्टर्स,आरोग्य कर्मचारी,अधिकारी,पोलिस कर्मचारी यांचा लढा अतुलनीय आहे,या लढ्यातील योद्ध्यांचे मनोबल उंचावण्याचा दृष्टीने त्यांचा सन्मान करणे,मानवंदना देणे आवश्यक आहे. या लढ्यात मनपाने सर्व स्तरावर प्रशंसनिय काम केलेले आहे त्यामुळे मनपाचे आम्ही कौतुक करीत आहोत. या लढ्यात भारतीय सैन्य दल आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले,लवकरच या लढ्यात आपल्याला यश मिळेल,या लढ्यातील मनपाच्या कार्यकर्तुत्ववाला भारतीय रक्षा मंत्रालयाच्या वतीने आम्ही सलामी देत असल्याचे त्यांनी सांगितले.
मा. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मनोगत व्यक्त करताना ,भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या वतीने केलेला सन्मान व दिलेली मानवंदना मनोबल उंचावण्यासारखी असल्याचे सांगितले तसेच या कार्यक्रमा करिता स्वतः ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांनी उपस्थित राहून मनोबल वाढविले यासाठी, मनपाचे वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. मा,मनपा आयुक्त यांनी मनोगत व्यक्त करताना या लढ्यातील योद्ध्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाने या माध्यमातून केलेला सन्मान नक्कीच मनोबल वाढविणारा असल्याचे सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अगरवाल यांनी प्रास्ताविक केले व सूत्रसंचालन सुरक्षा अधिकारी नितीन केंजळे यांनी केले व आभार प्रदर्शन अतिरिक्त मनपा आयुक्त शांतानु गोयल यांनी केले.कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी तसेच मनपा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,
दिनानाथ मंगेशकर रुग्णालय व पुणे महानगरपालिकेत सामंजस्य करार.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत पुणे महानगरपालिका व लता मंगेशकर मेडिकल फौंडेशनचे दिनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्यामध्ये "सामंजस्य करार", करण्यात आला आहे.या "सामंजस्य करारावर",पुणे महानगरपालिकेच्या वतीने मा,रुबल अग्रवाल,अतिरिक्त महापालिका आयुक्त,( जनरल ) व दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने विश्वस्त व वैद्यकीय संचालक .डॉ.श्री.धनंजय केळकर यांनी सह्या केल्या. याप्रसंगी पुणे मनपाच्या सहाय्यक आरोग्यप्रमुख डॉ,अंजली साबणे व दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ.भट उपस्थित होते.
सदरच्या करारानुसार पुणे शहरातील व पुणे मनपाने शिफारस केलेले पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक रुग्ण यांच्या उपचाराकरिता रुग्णालयात १२५ बेड,व अतिदक्षता विभागातील १५ बेड आरक्षित करण्यात येतील. शासनाच्या योजनेनुसार रुग्णालय उपचार केले जाणार आहेत. या व्यतिरिक्त १२५ बेड आयसोलेशन करिता व १५ बेड ICU करिता आरक्षित करण्यात येतील.रुग्णास डिस्चार्ज दिल्यानंतर येत्या तीन महिन्यात पुणे मनपाच्या वतीने बिलांची पूर्तता केली जाईल.रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सर्व जबाबदारी रुग्णालयाची राहील.रुग्णालयास आवश्यकतेनुसार पुणे महानगरपालिकेच्या वतीने पीपीई किट्स,एन-95,मास्क, वितरित करण्यात येतील.
परिमंडळ क्र. १ | ||||
---|---|---|---|---|
अ.क् | क्षेत्रिय कार्यालयाचे नाव | कर्मचारी यांचे नाव | हुद्दा | मोबाईल नंबर |
१ | नगररोड-वडगावशेरी | श्री. राजेश बनकर | प्र. सहाय्यक आयुक्त, | ९६८९९३११९७ |
श्री. अनिल डोळे | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक | ९६८९९३१०४३ | ||
श्री. सचिन गवळी | आरोग्य निरीक्षक | ९६८९९३९०४३ | ||
श्री. सुभाष तळेकर | अतिक्रमण निरीक्षक | ९६८९९३१६६८ | ||
२ | येरवडा-कळस-धानोरी | श्री. विजय लांडगे | सहाय्यक आयुक्त | ९६८९९३१५०१ |
श्री. संजय घावटे | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक | ९६८९९३१३५६ | ||
श्री. संदीप पवार | आरोग्य निरीक्षक | ९६८९९३१५२७ | ||
श्री. सुभाष जगताप | अतिक्रमण निरीक्षक | ९६८९९३१५४८ | ||
३ | ढोलेपाटील रोड | श्री. दयानंद सोनकांबळे | सहाय्यक आयुक्त | ९६८९९३११५४ |
श्री. सुनिल तन्वर | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक | ९६८९९३०८८४ | ||
श्री. संदीप रोकडे | आरोग्य निरीक्षक | ९६८९९३४५१२ | ||
श्री. सौरभ बारसकर | सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक | ७२१८३२०९३८ | परिमंडळ क्र. २ | |
४ | औंध-बाणेर | श्री. जयदीप पवार | सहाय्यक आयुक्त | ७०३९८३५९७९ |
श्री. विजय भोईर | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक | ९६८९९३११५७ | ||
श्री. राजेंद्र वैराट | आरोग्य निरीक्षक | ९६८९९३४०७६ | ||
श्री. उमेश नरूले | अतिक्रमण निरीक्षक | ९६८९९३१८६० | ||
५ | शिवाजीनगर-घोलेरोड | श्रीमती आशा राऊत | सहाय्यक आयुक्त | ९६५७१२९५१५ |
श्री. सुनिल कांबळे | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक | ९६८९९३१८८१ | ||
श्री. लक्ष्मण एकनाथ चौधरी | आरोग्य निरीक्षक | ९६८९९३९८४६ | ||
श्री. सचिन उतळे | अतिक्रमण निरीक्षक | ९६८९९३१६७९ | ||
६ | कोथरूड-बावधन | श्री. संदीप कदम | सहाय्यक आयुक्त | ९६८९९३१४२२ |
श्री. राम सोनवणे | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक | ९६८९९३१६२० | ||
श्री. शिवाजी गायकवाड | आरोग्य निरीक्षक | ९९२२५४१०२० | ||
श्री. रविंद्र वाणी | सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक | ८९९९१०७८४५ | परिमंडळ क्र. ३ | |
७ | सिंहगडरोड | श्रीमती जयश्री काटकर-बोराडे | सहाय्यक आयुक्त | ७७२२०६०९०३ |
श्री. आनंद शेंडगे | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक | ९६८९९३१०७५ | ||
श्री. संदीप खेराडे | आरोग्य निरीक्षक | ९६८९९००७४६ | ||
श्री. धम्मानंद गायकवाड | अतिक्रमण निरीक्षक | ७७२२००७५८५ | ||
८ | वारजे-कर्वेनगर | श्री. संतोष वारुळे | सहाय्यक आयुक्त | ८००७७७३३०१ |
श्री. गणेश खिरीड | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक | ९६८९९३१२२३ | ||
श्री. राहुल शेळके | आरोग्य निरीक्षक | ९८५०८४१७२७ | ||
श्री. अक्षय दाभाडे | सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक | ९७६३८९६६८० | ||
९ | धनकवडी-सहकारनगर | श्री. निलेश देशमुख | सहाय्यक आयुक्त | ९८५०७७५५५५ |
श्री. नरेंद्र भालेराव | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक | ९६८९९३१०५४ | ||
श्री. एकनाथ माने | आरोग्य निरीक्षक | ९९२२५४५२९० | ||
श्री. श्रीकृष्ण सोनार | अतिक्रमण निरीक्षक | ९६८९९३१६५९ | परिमंडळ क्र. ४ | |
१० | हडपसर-मुंढवा | श्री. सोमनाथ बनकर | सहाय्यक आयुक्त | ९६८९९३४२६१ |
श्री. संजय धनवट | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक | ९६८९९३१८७९ | ||
श्री. प्रविण गायकवाड | आरोग्य निरीक्षक | ७४४७४७२०२९ | ||
श्री. तुषार झोंबाडे | सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक | ७६२००००९०४ | ||
११ | कोंढवा-येवलेवाडी | श्री. तानाजी नरळे | सहाय्यक आयुक्त | ९४२०६१०९७० |
श्री. मंगलदास माने | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक | ९६८९९३१७१० | ||
श्री. सुनिल गोसावी | आरोग्य निरीक्षक | ९६८९९३६२९३ | ||
श्री. अजिंक्य कचरे | सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक | ८३०८७०८७३० | ||
१२ | वानवडी-रामटेकडी | श्री. युनुस पठाण | सहाय्यक आयुक्त | ९६८९९३१३८९ |
श्री. दिलावर आवटी | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक | ९६८९९३१४०० | ||
श्री. प्रदीपकुमार हरीभक्त राऊत | आरोग्य निरीक्षक | ९६८९९३१०८८ | ||
श्री. राजशेखर कांबळे | सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक | ७४४७८४८१३० | परिमंडळ क्र. ५ | |
१३ | बिबवेवाडी | श्री. गणेश सोनुने | प्र. सहाय्यक आयुक्त | ९६८९९३१५११ |
श्री. चंद्रकांत लाड | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक | ९६८९९३१४६८ | ||
श्री. राहुल बाठे | आरोग्य निरीक्षक | ९६८९९३६३१९ | ||
श्रीमती मेघा राऊत | अतिक्रमण निरीक्षक | ९६८९९३१९७५ | ||
१४ | भवानीपेठ | श्री. सचिन तामखेडे | सहाय्यक आयुक्त | ८६६८६९६७०२ |
श्री. मुक्तार शफिरहुद्दीन सय्यद | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक | ९६८९९३१७१८ | ||
श्री. समीर मसुरकर | आरोग्य निरीक्षक | ९६८९९३१४६९ | ||
श्री. राजेश खुडे | अतिक्रमण निरीक्षक | ९६८९९३१६४१ | ||
१५ | कसबा-विश्रामबागवाडा | श्री. आशिष महाडदळकर | सहाय्यक आयुक्त | ९६८९९३१२५६ |
श्री. सुनिल मोहिते | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक | ९६८९९३१३९९ | ||
श्री. नंदकुमार म्हांगरे | आरोग्य निरीक्षक | ९६८९९३५२८४ | ||
श्री. भिमाजी शिंदे | अतिक्रमण निरीक्षक | ९६८९९३१७५० |