करोना विषाणू

  राष्ट्रीय कॉल सेंटर : ०११ - २३९७८०४६        |        हेल्पलाईन : १०४        |        पुणे नियंत्रण कक्ष : ०२० - २६१२७३९४  

 

करोना विषाणूसंबधी माहिती आणि घ्यावयाची काळजी


करोना विषाणू-सर्वसाधारण माहिती

करोना हे एका विषाणू समूहाचे नाव आहे. हे विषाणू भारताला पूर्वीपासून माहित आहेत. २००३ मध्ये आढळलेला सार्स हा आजार किंवा २०१२ मध्ये आढळलेला मर्स हा आजार हे सुद्धा करोना विषाणूमुळे होणारे आजार आहेत. परंतु डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात सुरु झालेल्या या उद्रेकामध्ये जो करोना विषाणू आढळला तो यापूर्वीच्या करोना विषाणू पेक्षा वेगळा आहे. म्हणून त्याला नॉवेल अर्थात नवीन करोना विषाणू असे संबोधण्यात येते.जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास 'कोविड-१९' असे नाव दिले आहे.

 


करोनाचे मूळस्थान:

करोना हा प्राणी जगतातून मानवाकडे आलेला विषाणू आहे. तो मुख्यत्वे वटवाघळामध्ये आढळतो. बेसुमार जंगलतोड, वाढते शहरीकरण, कच्चे मांस खाण्याची सवय इत्यादी कारणांमुळे प्राणी जगतातील सूक्ष्मजीव मानवामध्ये प्रवेश करतात.

 


करोना विषाणू आजाराची लक्षणे

ही मुख्यत्वे श्वसन संस्थेशी निगडीत असतात. ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे,ताप,न्युमोनिया,काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात.

 

              ० ते ५ वर्ष वयोगट                   ५ वर्षावरील वयोगट
 • अचानक येणारा तीव्र ताप    (>३८c)
 • खोकला, घसा बसणे.
 • दम लागणे
 • श्वासास अडथळा
 • रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता
 • न्युमोनिआ
 • रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता

 


 

 • सदर आजाराच्या जनजागरणाकरिता महानगरपालिकेमार्फत पोस्टर्स, बनर्स छपाई करुन घेण्यात आले असुन सदर पोस्टर्स महत्वाच्या ठिकाणी निर्गमित करण्यात येत आहे. सदर आजाराबाबत वर्तमानपत्रात माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे व तसेच विविध रेडिओ चनेलवरून या आजाराची माहिती प्रसारित करण्यात येत आहे.

 • नवीन करोना विषाणू सद्यस्थिती आणि उपाययोजना :

  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा नागरिकांचे शंकानिरसन

 

 

 

 


ज्या अर्थी, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ [अ] नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. आणि ज्या अर्थी, आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत करोना विषाणू संसर्ग बाधित रूग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत असल्याने करोना विषाणूचे संशयित रुग्ण पुणे शहरातही आढळून आल्याचे निदर्शनास आलेले आहे.परदेश दौऱ्यावरून आलेल्या नागरिकांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे व त्यामध्ये १४ दिवसांसाठी खालील सूचनांचे पालन आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये पालन करणे या आदेशान्वये अनिवार्य करण्यात येत आहे.

घरात विलगीकरण कक्ष करण्याची सूचना

घरात विलगीकरण केलेल्या व्यक्तीने हवेशीर आणि वेगळी खोली ज्याला संडास बाथरूम जोडलेले आहे अशा खोलीमध्ये रहावे. जवळचे नातेवाईक जर त्या खोलीमध्ये राहणार असतील तर त्यांनी रूग्णापासून कमीत कमी एक मिटर अंतरावर रहावे.

परदेश दौऱ्यावरून आलेल्या नागरिकांनी स्वत:हून शासकीय आरोग्य यंत्रणेस संपर्क साधून माहिती कळविणे बंधनकारक आहे.

परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर १४ दिवस १०४ क्रमांकावर स्वत:ची आरोग्य विषयक माहिती कळविणे बंधनकारक राहील.

त्यामध्ये कोरोना सदृश आजाराची प्राथमिक लक्षणे आढळल्यास स्वत:हून नजीकच्या शासकीय रूग्णालयामध्ये तपासणी करावी व आवश्यकतेनुसार भरती व्हावे.

अशा व्यक्तीने घरातील वृध्द, गर्भवती स्त्री, लहान मुले व प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये.

अशाव्यक्तीने घरातील त्यांचा वावर सिमीत ठेवावा

अशा व्यक्तींनी त्यांच्या पूर्व नियोजीत सभा, न्यायालयीन कामकाज इ. बाबत वेळीच संबंधित प्राधिकारी यांना कळवून सदर सभांना न्यायालयीन कामकाजांना गैरहजर राहणार असल्याची पूर्व परवानगी घ्यावी. अशा व्यक्तीने अल्कोहोलयुक्त हॅण्ड सॅनीटायझर किंवा साबण आणि पाण्याने वारंवार व्यवस्थित हात धुवावेत. अशा व्यक्तीने वापरलेले ताट, वापरलेले पाण्याचे ग्लास, कप, जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरूण, गादी आणि इतर दैनंदिन वापरातील घरगुती वस्तू घरातील इतर व्यक्तींना वापरण्यास देऊ नये. अशा व्यक्तींनी पूर्ण वेळ सर्जीकल मास्कचा वापर करावा. मास्क दर ६ ते ८ तासांनी बदलावा आणि वापरलेल्या मास्कची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी. डिस्पोजेबल मास्क पुन्हा वापरू नयेत. अशा व्यक्तींनी / त्यांची सुश्रुषा करणाऱ्या व्यक्तीने / निकट सहवासीतांनी घरातील सुश्रूषे दरम्यान वापरलेले मास्क ५ टक्के ब्लिच सोल्यूशन किंवा १ टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणामध्ये निर्जतुक करून त्याची जाळून विल्हेवाट लावावी. वापरलेला मास्क हा जंतुसंसर्गयुक्त समजावा.


घरी विलगीकरण केलेल्या करोनाग्रस्त रूग्णाच्या नातेवाईकांसाठी सूचना

एकाच नातेवाईकाने अशा व्यक्तीची सुश्रुषा करावी. अशा व्यक्तींच्या शरीराशी थेट संपर्क येणे टाळावे आणि त्यांचे वापरलेले कपडे झटकू नये. घरातील विलगीकरण कक्षाची स्वच्छता करताना किंवा अशा व्यक्तींचे वापरलेले कपडे हाताळताना डिस्पोजेबल ग्लोव्हजचा वापर करावा. डिस्पोजेबल ग्लोव्हज काढल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.

नातेवाईक आणि इतरांना अशा व्यक्तींना भेटून देऊ नये. घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेल्या व्यक्तींना जर कोविड-१९ बाबत लक्षणे आढळून आली तर त्याच्या निकट संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना १४ दिवस घरातील विलगीकरण कक्षात ठेवावे व पुढील १४ दिवस किंवा अशा व्यक्तीचा प्रयोगशाळा रिपोर्ट निगेटीव्ह येईपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा.


घराच्या स्तरावरील विलगीकरण कक्षाची स्वच्छता

घरात केलेल्या विलगीकरण कक्षातील असलेल्या व्यक्तीच्या खोलीमधील वारंवार हाताळल्या जाणाऱ्या वस्तूंचे [फर्निचर, बेड फ्रेम, टेबल] १ टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जंतुकीकरण करावे. शौचालयाची स्वच्छता आणि अशा व्यक्तींचे संपर्कात आलेले कपडे, अंथरूण पांघरूण हे घरातील डिटर्जंट वापरून वेगळे स्वच्छ धुवून वाळवावे. निर्जंतुकीकरण घरगुती ब्लिच किंवा घरगुती फिनायलने करावे. उपरोक्त सूचनांचे तंतोतंत पालन करणेत यावे अन्यथा नियमानुसार कारवाई करुन संस्थात्मक विलगीकरण कक्षात स्थलांतरीत करणेत येईल, याची गांभीयपूर्वक नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

 

 

 


राज्यात करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

 

 

 


घरोघरी सर्वेक्षणाचे कामकाज सुरु

सद्यस्थितीत करोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधाकरिता ( कंटेनमेंट प्लॅन ) अंतर्गत करावयाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून हे सर्वेक्षण केले जाणार असून पुणे मनपा परिसरात घरोघरी जाऊन मनपातील पथके आजपासून हे सर्वेक्षण करणार आहेत. ३० कर्मचाऱ्यांचे १ पथक अशी सुमारे १२५ पथके तयार करण्यात आली असून या पथकात आरोग्य निरीक्षक,समूह संघटिका,विभागीय आरोग्य निरीक्षक,वैद्यकीय अधिकारी,अशा विविध पदनिहाय कर्मचारी व अधिकारी यांचा समावेश आहे, संपूर्ण शहरात विशेषतः प्रादुर्भाव असलेल्या भागात, तसेच गेल्या महिनाभरापासून परदेशातून पुण्यात आलेल्या देशी- परदेशी नागरिकांच्या घरी जाऊन भेटी घेणे,कोरोना संदर्भात माहिती देणे,कोरोना बाबत लक्षणे आढळल्यास, डॉ, नायडू रुग्णालयात तपासणी करणे, वैद्यकीय सल्ला,मार्गदर्शन घेणे,विलगीकण म्हणजे काय?घरी १४,दिवस विलगीकरण कसे करावे याचबरोबर मनपाचे वतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजना याबाबत माहिती देऊन जनजागृती केली जाणार आहे.


 


 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा