कामगार कल्याण विभाग

Select Initiatives

सांस्कृतिक कार्यक्रम

वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम

 

पुणे महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांसाठी दरवर्षी फेब्रुवारी आणि मेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये नाटक, नृत्य, फॅन्सी ड्रेस, संगीत रजनी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. हे सर्व कार्यक्रम सांस्कृतिक समितीद्वारे आयोजित करण्यात येतात. या समितीमध्ये खालील सदस्यांचा समावेश असतो.

 

मुख्य कामगार अधिकारी अध्यक्ष
कामगार अधिकारी सचिव
प्रत्येक संवर्गातील प्रतिनिधी सदस्य
व्यवस्थापक, सांस्कृतिक केंद्र सदस्य

राष्ट्रीय दिनांचे आयोजन

दरवर्षी पुणे महानगरपालिकेत खालील महत्वाचे राष्ट्रीय दिन साजरे केले जातात:

  • १५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन
  • २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन
  • २६ नोव्हेंबर - संविधान दिन
  • १ मे - कामगार दिन
  • १० डिसेंबर - मानवी हक्क दिवस

मराठी भाषा संवर्धन

मराठी भाषा संवर्धन आणि विकासासाठी मराठा भाष संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने घेतलेल्या निर्णायाप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या समितीमध्ये खालील सदस्यांचा समावेश असतो.

मा. महापौर अध्यक्ष
मा. उपमहापौर सदस्य
सर्व विशेष समित्यांचे अध्यक्ष सदस्य
निवडून आलेल्या सर्व राजकीय पक्षांचे सर्व प्रतिनिधी सदस्य
मा. आयुक्त सदस्य
मुख्य कामगार अधिकारी सचिव
पुणे शहरातील मराठी भाषा तज्ज्ञ सदस्य

या समितीमार्फत खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते

मराठी सप्ताह

दरवर्षी २१ ते २७ फेब्रुवारी दरम्यान मराठी सप्ताह साजरा करण्यात येतो. कवी संमेलन, हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा, ग्रंथप्रदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

साहित्य कट्टा

पुणे महानगरपालिकेने शहरातील ६ उद्यानांमध्ये साहित्य कट्ट्याचे आयोजन केले जाते. या माध्यमातून लेखक आणि कवी नागरिकांशी कविता, नाटक, साहित्य आदी विषयांवर संवाद साधू शकतात.

पुरस्कार सोहळा

या समितीमार्फत नव्या कादंबरी, पुस्तक, साहित्य लेखकांना आणि कवींना २५,०००/- रुपयांचे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

या समितीमार्फत कादंबरी, पुस्तके, साहित्य आदींचे प्रदर्शन भरविण्यात येते.