Quick Links

Overview & Functioning

पुणे महानगरपालिकेच्या सर्वसमावेशक सायकल प्लॅन विभागामार्फत खालील जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात.  

  1. सायकल आराखडयाचा अंमलबजावणीचे नियोजन करणे, बजेट तयार करणे, अंमलबजावणीकरिता पुणे मनपाच्या विविध विभागांशी, क्षेत्रिय कार्यालयांशी, अन्य घटक आणि बाह्‌य यंत्रणा व विभागांशी समन्वय साधणे आणि अंमलबजावणीचे देखरेख करणे व आढावा घेणे असे कामकाज करावयाचे आहे.
  2. सायकलिंग व पादचारी यांना अनुकूल पायाभूत सुविधा विकसीत करण्यामध्ये आणि त्यांच्या देखरेखीमध्ये लोकांचा व सायकलचालकांचा सहभाग मिळविणेच्या दृष्टीने कामकाज करावयाचे आहे.
  3. वाहतुकीचे साधन म्हणून सायकलचा वापर करण्याचे सध्याचे प्रमाणे टिकविण्याबरोबरच अन्य संभाव्य वापरकर्त्यांना सायकलिंगसाठी उद्युक्‍त करणेबाबत प्रयत्न करावयाचे आहेत.
  4. वाहतुकीमध्ये स्वयंचलित वाहनांपेक्षा सायकलिंगला प्राधान्य मिळवून देणे.
  5. पुणे महानगरपालिकेने तज्ञ सल्लागारांमार्फत तयार केलेल्या एकात्मिक सायकल आराखड्‌याप्रमाणे कामकाजावर देखरेख व नियंत्रण करणे.
  6. आराखडयात दर्शविलेले सर्व सायकल मार्ग पुणे मनपाचे विकास आराखडयात आवश्यकतेनुसार समाविष्ट करणे.
  7. पुणे पब्लिक बायसिकल शेअर (PBS) धोरणानुसार कामकाज पाहणे.

 

image