समाज विकास विभाग

Select WOMEN AND CHILD WELFARE LAWS

पाळणाघर

पुणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागातर्फे पुणे शहरातील लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळा, काँग्रेस हाऊसमागे, शिवाजीनगर, पुणे ५ येथे महानगरपालिका सेवक तसेच सामान्य नागरिकांच्या मुलांसाठी पाळणाघर चालविले जाते. या पाळणाघरासाठी महानगरपालिका सेवकांसाठी दर महिन्याला १०० रुपये तर नागरिकांकडून १५० रुपयेएवढे शुल्क आकारले जाते. हे पाळणाघर सकाळी ७.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत सुरु असते. येथे एकावेळी ३० मुलांची सोय होऊ शकते. पाळणाघरात ३ महिन्यांपासून ५ वर्षापर्यंतच्या मुलांना सांभाळले जाते.

मुलांची काळजी घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या दोन परिचारिका २ शिफ्टमध्ये काम करतात. याशिवाय, पाळणाघरातील स्वच्छता, अन्न शिजवणे व वाढणे, लहान मुलांची खेळणीची व्यवस्था, मुलांचा सांभाळ करणे तसेच पाळणाघराचा संपुर्ण परिसर नीटनेटका ठेवण्यासाठी काही Volunteers अर्थात स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा संपुर्ण खर्च पुणे महानगरपालिकेतर्फे केला जातो.

पाळणघराचा पत्ता-  लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळा, काँग्रेस हाऊसमागे, शिवाजीनगर, पुणे ५


योजनांविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी संपर्क साधाः
१)प्रभाग पातळीवरील समुह संघटिकांचे कार्यालय, पुणे
२)तुमच्या जवळील क्षेत्रिय कार्यालय
३)समाज विकास कार्यालय, एस.एम. जोशी हॉल, दारुवाला पूल, रास्ता पेठ, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क साधा- ०२०-२५५०१२८१/८२/८३/८४