Projects

Select Projects

धनकवडी उड्डाणपूल

उड्डाणपूलाची आवश्यकता- पुणे शहराचे दक्षिण प्रवेशद्वार असणाऱ्या सातारा रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. वाहतूक कोंडी ही या रस्त्यावरची नियमित समस्या आहे. सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी धनकवडी येथे उड्डाणपूल बांधण्याची गरज निर्माण झाली होती. 

साधारण वैशिष्ट्ये- उड्डाणपूलावर तीन चौक आहेत, अहिल्यादेवी चौक, बालाजी नगर चौक आणि राजर्षी शाहू बँक चौक. चारपदरी पूलाचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर आता वाहतूकीसाठी १० पदरी रस्ता उपलब्ध झाला आहे. त्यापैकी दोन मार्ग बीआरटीसाठी असून पूलाच्या एका बाजूला दोन ते तीन पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत. या उड्डाणपूलाची लांबी १२९६ मीटर असून त्यापैकी ८७२ मीटरचा व्हायडक्ट भाग आहे. कात्रजच्या बाजूला ८० मीटर जोडणी असून स्वारगेटच्या बाजूला ३४४ मीटर अंतर जोडलेले आहे. उड्डाणपूलाची रुंदी १५.८० मीटर असून प्रत्येक जोडणीची रुंदी ७.९ मीटरएवढी आहे. 

उड्डाणपूलाचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर या रस्त्यावरुन जाणारी ६० टक्के वाहने उड्डाणपूलाचा उपयोग करतात. 

अंदाजे खर्च

६२.१५ कोटी रुपये

कंत्राट रक्कम

५५.७८ कोटी रुपये

कालावधी

३० महिने

प्रकल्पाचा प्रारंभ

२८/१२/२०११

प्रकल्प पुर्ण करण्याची निर्धारित तारीख

२७/०६/२०१४

कालमर्यादेत वाढ

३०/०४/२०१५

वाहतुकीसाठी खुला झाल्याची तारीख

२५/०७/२०१५

उड्डाणपूलाची एकुण लांबी

जोडणीसह १२९६ मीटर

व्हायडक्टची लांबी

८७२ मीटर

जोडाची लांबी

कात्रजच्या बाजूचा जोड- ८० मीटर

 

स्वारगेटच्या बाजूचा जोड – ३४४ मीटर

उड्डाणपूलाची रुंदी

१५.८० मीटर (चार पदरी)

जोडांची रुंदी

७.९० मीटर (दोन पदरी)

पायाचा प्रकार

खुला

पियर्सची संख्या

५१

बेअरिंग्सचा प्रकार

पीओटी पीटीईई बिअरिंग्स

सुपरस्ट्रक्चरचा प्रकार

प्रीकास्ट प्रीस्ट्रेस्ड गिर्डर्स आणि डेक स्लॅब- २७ कमानी

 

सॉलिड स्लॅब इंटिग्रल स्ट्रक्चर ऑन पोर्टल पियर – १४ कमानी

एक्सपान्शन जॉईंट्सचा प्रकार

स्ट्रिप सिल

बीआरटी मार्ग

उड्डाणपूलाच्या खाली प्रत्येकी ३.५ मीटरचे तीन मार्ग

पादचाऱ्यांसाठी सबवे

एट ग्रेड- ६ मीटर रुंद X २.४ मीटर उंच

उड्डाणपूलाच्या बांधकामादरम्यान वापरण्यात आलेले साहित्य

सिमेंट – सुमारे १०५०० एमटी

 

स्टील – सुमारे २९०० एमटी

dhankawadi flyover dhankawadi flyover dhankawadi flyover dhankawadi flyover dhankawadi flyover dhankawadi flyover dhankawadi flyover