पुणे शहरातील नागरिकांना अधिकाधिक सुलभ सेवा मिळाव्यात यासाठी पुणे महानगरपालिकेत डिजीटल एक्सपिरियन्स सेंटर (डीईसी) उभारण्याचे प्रस्तावित आहे. डीईसीमध्ये तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक साधनांद्वारे नागरिकांना सेवा प्रदान केल्या जातील. त्यामध्ये एलईडी स्क्रिन्स, टच स्क्रिन कियोस्क, दृकश्राव्य व्यवस्था असतील.