समाज विकास विभाग

Select WOMEN AND CHILD WELFARE LAWS

दिव्यांग कल्याण योजना

​पुणे महानगरपालिकेने राबविलेल्या दिव्यांग कल्याणकारी योजनांची माहिती खालीलप्रमाणे: 

१) मोफत बसप्रवास पास योजना
पुणे शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींना पीएमपीएमएल बसेसचे मोफत वार्षिक पासेस दिले जातात. या पासेसची रक्कम पुणे महानगरपालिकेकडून पीएमपीएमलला दिली जाते.

२) कृत्रिम अवयव खरेदीसाठी अर्थसहाय्य
पुणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागातर्फे दिव्यांग व्यक्तींना श्रवणयंत्र, व्हीलचेअर, तीनचाकी वाहन व अन्य कृत्रिम अवयवांच्या खरेदीसाठी रु. २०,००० पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.

३) स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य
पुणे महानगरपालिकेतर्फे १८ ते ४५ वयोगटातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी रु. ५००० इतके अर्थसहाय्य दिले जाते.

४) व्यावसायिक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य
पुणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागातर्फे सरकारमान्य संस्थांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या व्यक्तींना रु.१०,००० इतके अर्थसहाय्य दिले जाते.

५) उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्यः पुणे महानगरपालिकेतर्फे वैद्यकीय, संगणकविषयक, इंजिनिअरिंग, एमबीए इत्यादी पदविका, पदवी व तत्सम शासनमान्य संस्थेत व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुर्ण कालावधीत दरवर्षी रु. १०,००० अर्थसहाय्य दिले जाते. यासाठी विद्यार्थ्याला दरवर्षी किमान उत्तीर्ण गुण मिळणे आवश्यक आहे.
 


योजनांविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी संपर्क साधाः
१)प्रभाग पातळीवरील समुह संघटिकांचे कार्यालय, पुणे
२)तुमच्या जवळील क्षेत्रिय कार्यालय
३)समाज विकास कार्यालय, एस.एम. जोशी हॉल, दारुवाला पूल, रास्ता पेठ, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क साधा- ०२०-२५५०१२८१/८२/८३/८४