विविध कामांसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

आवश्यक कागदपत्रे

झोपडीधारकांना फोटोपास मिळविण्यासाठी व योजनेसाठी खालीलप्रमाणे पुरावे सादर करावे लागतात.

 • दि. २२ जून २०१४ व १६ मे २०१५ चे शासन निर्णयानुसार खालीलप्रमाणे पुरावे.

           दि.१/१/२००० पूर्वीच्या मतदार यादीत नाव असले पाहिजे.

 • किंवा
 • दि. १/१/२००० पूर्वी सदर झोपडीधारक राहत असलेले पुरावे.
 • लाईट बिल
 • टेलिफोन बिल
 • विक्री कर
 • व्यवसाय कर
 • आयकर अथवा इतर कर भरलेचे पुरावे.
 • दि. १/१/२००० पूर्वीचे रेशनिंग कार्ड.
 • शाळा सोडल्याचा दाखला.
 • जन्म- मृत्यूचा दाखला.
 • वाहन चालवण्याचा परवाना.
 • पासपोर्ट
 • सन२००० पूर्वीचे बँकेचे पासबुक
 • आदिवास प्रमाणपत्र
 • मतदार ओळखपत्र.
 • निवासी झोपडीधारकाकडून दि. १/१/२००३ पासूनची थकबाकी भरली गेली असली पाहिजे.
 • शासनाच्या उपक्रमाच्या जमिनीवरील खेळाची मैदाने, रिक्रीऐशन ग्राउंड,इ. तसेच नॉन
 • बिल्डेबल जमिनीवरील दि. १/१/२००० पूर्वीपासून असलेला पात्र झोपडीधारक पात्र राहिल.
 • शासकीय/निमशासकीय संस्थांनी दिलेला व्यवसायिक परवाना, लायसेन्स, गुमास्ता लायसेन्स, खानावळ किंवा उपहारगृह लायसेन्स, औोगिक परवाना. दि. १/१/२००० पूर्वीचे इतर कायदेशीर पुरावे​

 

दुबार फोटोपास मिळविण्यासाठी  आवश्यक कागदपत्रे

 • दुबार ओळखपत्र मागणी अर्ज.
 • मूळ ओळखपत्राची झेरॉक्स प्रत.
 • चालू आर्थिक वर्षाचे सेवाशुल्क भरणा पावतीची छाया प्रत.
 • मूळ ओळखपत्र हरवल्याबाबत पोलीसांकडील F.I.R. दाखला.
 • पती-पत्नीचे एकत्रित दोन पासपोर्ट फोटो​

 

झोपडपट्टीमध्ये नळ कनेक्शन वीज कनेक्शन ना हरकत दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • झोपडीधारकांचा अर्ज
 • सुधारित शासन निर्णयानुसार संरक्षित झोपडी वा पात्रतेबाबतचा पुरावा.
 • चालू आर्थिक वर्षाचे सेवाशुल्क भरणा पावतीची छाया प्रत.

 

झोपडीचे हस्तांतरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • झोपडीधारकांचा मूळ फोटोपास किंवा गणना पत्रकाची पोहच.
 • प्रचलित शासन निर्णयानुसार हस्तांतरणाची फी भरणे व प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
 • विहित नमुन्यातील हमीपत्र.
  • दि. १/१/२००० पूर्वीचे मतदार यादीतील नाव
  • दि. १/१/२००० पूर्वीचे मतदार यादीतील नाव किंवा
  • दि. १/१/२००० पूर्वीचे निवडणूक ओळखपत्र किंवा
 • दि. १/१/२००० पूर्वीचे सदर ठिकाणावरील शासकीय/निमशासकीय परवाने किंवा पुरावे-जन्म- मृत्यू दाखले/गुमास्ता परवाना/वीज बिल/टेलिफोन बिल/विक्रीकर, व्यवसायकर, आयकर अथवा इतर कर भरणा केल्याचे पुरावे यापैकी एक पुरावा .
 • दि. १/१/२००० पूर्वीचे निवडणुक ओळखपत्र, दि. १/१/२००० पूर्वीचे सदर ठिकाणावरील शासकीय व निमशासकीय परवाने किंवा पुरावे.

 

झोपडीच्या वारसा हक्कासंदर्भात आवश्यक कागदपत्रे

 • झोपडीधारकाचा मूळ फोटोपास किंवा गणनापत्रकाची पोहोच
 • आई/वडिलाचां मृत्यू दाखला.
 • इतर वारसदार यांचे कायदेशीर संमतीपत्र.

          अ) दि. १/१/२००० पूर्वीचे मतदार यादीतील नाव किंवा

          ब) दि. १/१/२००० पूर्वीचे निवडणूक  ओळखपत्र किंवा

          क) दि. १/१/२००० पूर्वीचे सदर ठिकाणावरील शासकीय/निमशासकीय परवाने किंवा पुरावे-जन्म- मृत्यू दाखले/गुमास्ता परवाना/वीज बिल/टेलिफोन बिल/विक्रीकर, व्यवसायकर, आयकर अथवा  इतर भरणा केल्याचे पुरावे यापैकी एक पुरावा .

 • वारसदार व्यक्तीचे पुरावे - आधार ओळखपत्र क्र./सध्याचे निवडणुक ओळखपत्र/मतदार यादीतील नाव. सदर झोपडीत सस्थितीत कुटूंबाचे वास्तव्य आवश्यक.