कामगार कल्याण विभाग

Select Initiatives

कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण

कामगार शिक्षण कार्यक्रम

केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे पुणे महानगरपालिकेतील वर्ग-३ आणि वर्ग-४ संवर्गातील कर्मचार्‍यांसाठी कामगार शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये ४५ दिवसांचे प्रशिक्षण आणि १० दिवसांच्या शैक्षणिक दौर्‍याचा समावेश असतो. दरवर्षी ४० कर्मचार्‍यांचा समावेश असलेल्या ४ गटांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रशिक्षणामध्ये पुणे मनपाचे दैनंदिन कामकाज, व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्ये, वेळेचे व्यवस्थापन आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने आयोजित करण्यात येतात.

नियम आणि अटी

  • संपूर्ण सेवेमध्ये केवळ एका कर्मचार्‍याला केवळ एकदाच प्रशिक्षण घ्यावे लागते.
  • प्रशिक्षण घेणार्‍या कर्मचार्‍याचे वय ५५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • प्रशिक्षणासाठी विभागप्रमुखांची शिफारस आवश्यक असते.

आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • विभागप्रमुखांची शिफारस

महिलांसाठी विशेष प्रशिक्षण

विभागामार्फत महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिला दिनाच्या दिवशी (८ मार्च) महिलांसाठी विशेष व्याख्यानांचे आयोजन केले जाते.