कार्यान्वयनासंदर्भातील आणि गरजांचे विश्लेषण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेत डॅशबोर्ड बसविण्यात आले आहेत.
विश्लेषणात्मक डॅशबोर्डस -
प्रत्यक्ष घेण्यात येत असलेल्या निर्णयाबाबतची सविस्तर माहिती विश्लेषणात्मक डॅशबोर्डवर दिसून येते. यातून पुढील बाबी साध्य होतात -
-
नागरिकांचे मुद्दे किंवा तक्रारी प्रभावीपणे सोडविण्यासाठी कालावधी निश्चित करणे
-
मोठ्या प्रमाणातील माहितीतून आवश्यक तेवढी माहिती मिळविणे
-
व्यवस्थापकीय कार्यक्षमता वाढविण्यासाठीच्या उपक्रमांचे ध्येय निश्चित करण्यासाठी अत्याधुनिक नमुने वापरणे. त्यातून कल आणि संधी ओळखणे.
कार्यान्वयनाचे डॅशबोर्डस -
निश्चित करण्यात आलेल्या मानांकनानुसार संबंधित क्षेत्र/काम सुरु आहे किंवा नाही याची माहिती कार्यान्वयनाच्या डॅशबोर्डद्वारे प्राप्त होते.
खालील आकृती या डॅशबोर्डची कार्यपद्धती दर्शविण्यात आली आहे –
विश्लेषणाचे प्रकार -
डॅशबोर्डशिवाय विश्लेषणाची क्षमता असलेल्या परिमाणांची यादी खालीलप्रमाणे –
- आर्थिक अहवाल आणि एकत्रीकरण
- नियोजन आणि विश्लेषण
- विश्लेषण आणि नमुने (ट्रेण्ड, परिस्थिती आणि समस्या)
- अंदाज (विश्लेषणाचा अंदाज, अनुकरण)
- धोक्याचे विश्लेषण (मान्यता, कर्ज आणि उधारी)
- सर्वसमावेश दृष्टि (नागरिक, कर्मचारी, पुरवठादार, एजन्सी)
- मेट्रिक्स आणि निर्देशक (सर्वोत्कृष्ट १० कामगिरी)
- अभिप्रायांचे (भावनांचे) विश्लेषण
- संख्यात्मक आणि संख्यात्मक नसलेल्या माहितीचे विश्लेषण
डॅशबोर्डवरील निर्देशांक सूचक सूची -
- महानगरपालिकेचे आर्थिक सूचक (विभागनिहाय/वॉर्डनिहाय/प्रकल्पनिहाय)
- एकूण महसूल संकलन – विशिष्ट तारखेपर्यंतचे संकलन आणि एकत्रित संकलन
- विभागनिहाय महसूल संकलन – एकूण आणि वर्गीकृत
- खर्च: प्रमुख बाबी आणि त्यावर झालेला खर्च
- भांडवली खर्चातील प्रमुख बाबी
- एकूण अंदाजपत्रक आणि
- अंदाजपत्रक – अंदाजी
- अंदाजपत्रक – निविदा
- अंदाजपत्रक – सुरू असलेली कामे (कामाचे आदेश आणि कामाच्या आदेशांची तारीख)
- दरडोई उत्पन्न
- करविरहित महसूल आणि दरडोई उत्पन्नाचे प्रमाण
- दरडोई मिळकतकर
- मिळकतकराची व्याप्ती
- मिळकतकर संकलनाची कामगिरी (लाल/हिरवा/पिवळा बदलता येण्याजोगे इशारे)
- पाणीपट्टी संकलनाची कामगिरी (लाल/हिरवा/पिवळा बदलता येण्याजोगे इशारे)
- कार्यकारी गुणोत्तर (खर्च/जमा)
- महसूलाच्या तुलनेतील वेतनाची टक्केवारी
- प्रति १००० लोकसंख्येसाठीचा कर्मचारी वर्ग
- कर्जसेवांचे गुणोत्तर (कर्ज/महसूल)
- महानगरपालिका सेवा वितरणाचा निदर्शक - पाणी
- पाणीपुरवठा जोडण्यांची व्याप्ती (शहरातील एकूण घरांशी तुलना करता टक्केवारी)
- दरदोई पाणीपुरवठ्याचे प्रमाण
- पाणीपुरवठा जोडण्यांना लावण्यात आलेल्या मीटर्सची व्याप्ती (शहरातील एकूण घरांशी तुलना करता टक्केवारी)
- महसूल प्राप्त न होणार्या पाण्याची व्याप्ती
- पाणीपुरवठ्यातील सातत्य (प्रतिदिन/प्रतितास सातत्याने होणारा एकूण पाणीपुरवठा)
- ग्राहकांच्या तक्रारी निवारण करण्याची क्षमता (एका महिन्यात किंवा आठवड्यात प्राप्त झालेल्या तक्रारी आणि निराकरण करण्यात आलेल्या तक्रारींची टक्केवारी)
- पुरवठा करण्यात आलेल्या पाण्याचा दर्जा
- पाण्यासंबंधीचे शुल्क संकलन करण्याची कार्यक्षमता (देयके आणि मासिक/त्रैमासिक/वार्षिक संकलन)
- महानगरपालिका सेवांच्या वितरणाचे निदर्शक – मल:निस्सारन आणि स्वच्छता
- शौचालयांची व्याप्ती (एकूण घरांच्या संख्येसोबतची टक्केवारी किंवा दरडोई प्रमाण))
- गटार व्यवस्थापनासंदर्भाती सेवा (एकूण घरांच्या संख्येसोबतची टक्केवारी))
- गटारांची संकलन व्यवस्थेची कार्यक्षमता (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता आणि शहरात निमार्ण होणारे सांडपाणी एकूण सांडपाणी यांचे प्रमाण))
- प्रक्रिया झालेल्या सांडपाण्याची गुणवत्ता )
- ग्राहकांच्या तक्रारी निवारण करण्याची क्षमता (एका महिन्यात किंवा आठवड्यात प्राप्त झालेल्या तक्रारी आणि निराकरण करण्यात आलेल्या तक्रारींची टक्केवारी)
- महानगरपालिका सेवांच्या वितरणाचे निदर्शक – घनकचरा व्यवस्थापन
- घरगुती स्तरावर घनकचरा व्यवस्थापन करण्याची व्याप्ती (एकूण घरांच्या तुलनेतील टक्केवारी)
- महानगरपालिकेच्या घनकचरा संकलनाची क्षमता (मोजमाप निश्चित करण्याची गरज)
- महानगरपालिकेच्या घनकचरा संकलनाची व्याप्ती (मोजमाप निश्चित करण्याची गरज)
- महानगरपालिकेच्या घनकचर्यावर प्रक्रिया करण्याची व्याप्ती (मोजमाप निश्चित करण्याची गरज)
- वैज्ञानिक घनकचर्याची विल्हेवाट लावण्याची व्याप्ती (मोजमाप निश्चित करण्याची गरज)
- ग्राहकांच्या तक्रारी निवारण करण्याची क्षमता (एका महिन्यात किंवा आठवड्यात प्राप्त झालेल्या तक्रारी आणि निराकरण करण्यात आलेल्या तक्रारींची टक्केवारी)
- महानगरपालिकेच्या सेवा वितरणाचे निदर्शक: वाहत्या पाण्याचा निचरा
- वाहत्या पाण्याचा निचरा करण्याची क्षमता (शहरातील सांडपाणी वाहून नेणारे एकूण किलोमीटर आणि प्रती चौ.कि.मी. मध्ये असलेल्या सांडपाण्याच्या लाईन्स)
- एका महिन्यात पाणी तुंबणे/पूराच्या अवस्थेचे प्रकार
- महानगरपालिकेच्या सेवा वितरणाचे निदर्शक: वाहत्या पाण्याचा निचरा
- दरडोई रस्त्यांची लांबी
- पृष्ठभागावरील रस्त्यांचे प्रमाण
- ओ अॅण्ड एम प्रति किलोमीटर रस्ते
- महानगरपालिकेच्या सेवा वितरणाचे निदर्शक: तक्रार निवारण
- एकूण तक्रारी (आपले सरकार + तक्रार निवारणाचे पोर्टल)
- प्रलंबित तक्रारी – आपले सरकार
- प्रलंबित तक्रारी – तक्रार निवारण पोर्टल
- निवारण केलेल्या तक्रारी – आपले सरकार
- निवारण केलेल्या तक्रारी – तक्रार निवारण डॅशबोर्ड
- नागरिक समाधान तक्ता
- एकूण नागरिक अभिप्राय
- ६० दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या तक्रार (आपले सरकार + तक्रार निवारण डॅशबोर्ड)
- ३० दिवसांपेक्षा अधिक मात्र ६० दिवसांपेक्षा कमी काळापासून प्रलंबित असलेल्या तक्रारी
- १५ दिवसांपेक्षा अधिक मात्र ३० दिवसांपेक्षा कमी काळापासून प्रलंबित असलेल्या तक्रारी
- तक्रारींचे वेळेत निवारण
- वेळेनंतर तक्रारींचे निवारण
- महानगरपालिकेच्या सेवा वितरणाचे निदर्शक: तक्रार निवारण – आस्थापना विभाग
- भाडेतत्वावर दिलेल्या मालमत्तांची संख्या
- वितरित केलेल्या मालमत्तांची संख्या
- दरमहा / वार्षिक भाडे संकलन
- भाडे संकलनाची कार्यक्षमता (देयके आणि संकलति रक्कम)
- अर्थसंकल्पानुसार संकलित करण्यात आलेले भाडे विरुद्ध प्रत्यक्ष भाडे संकलन