कामगार कल्याण विभाग

Select Initiatives

आर्थिक उपक्रम

अर्थसहाय्य

सेवेमध्ये असताना निधन झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना पुणे महानगरपालिकेच्या निधीतून ५२,५००/- रूपयांची आर्थिक मदत करण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील अर्ज (कर्मचार्‍याच्या निधनानंतर एक वर्षाच्या आत)
  • कर्मचार्‍याचे मृत्यू प्रमाणपत्र
  • शिधापत्रिकेची छायाप्रत
  • वारसांकडून प्रतिज्ञापत्र

संगणकासाठी कर्ज

पुणे महानगरपालिकेतील वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचार्‍यांना संगणक खरेदीसाठी ३ टक्के व्याजाने कर्ज देण्यात येते. त्यासाठी कर्मचार्‍याची ५ ते १५ वर्षादरम्यान सेवा झालेली असावी. संगणक कर्जासाठी मुख्य कामगार अधिकार्‍याच्या मान्यता आवश्यक असते.

आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • संबंधित विभागप्रमुखांची शिफारस
  • संगणकाच्या किंमतीचे अंदाजपत्रक
  • हमीपत्र

सेवेमध्ये असताना एखाद्या कर्मचार्‍याने जर वारसाचे नामांकन केले नाही तर अशा स्थितीत संबंधित कर्मचार्‍याच्या निधनानंतर त्याच्या वारसाला हमीपत्रावर भविष्य निर्वाह निधीसह अन्य सर्व प्रकारची रक्कम प्रदान करण्यात येईल.

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी सेवा पूर्ण करून निवृत्त झाल्यानंतर या विभागाच्या मान्यतेनंतर त्याला भविष्य निर्वाह निधी प्रदान करण्यात येईल.

कामगार

महानगरपालिकेच्या सेवा नियम १३३ आणि कामगार भरपाई कायदा, १९२३ नुसार कर्मचार्‍याचा निधी त्याला किंवा त्याच्या वारसाला देण्यात येतो. कामगार भरपाई कायदा, १९२३ नुसार हा विभाग कर्मचार्‍याला निधी देतो.