अग्नि प्रतिबंधक वाहन

 • अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन बनविण्यात आलेल्या अग्नि प्रतिबंधक वाहनामध्ये फायर टेंडरिंग तसेच आणीबाणीच्या परिस्थितीत बचाव कार्य करण्याचे एकत्रित वैशिष्ट्य आणि वेगाने धावण्याची क्षमता आहे. हे वाहन आपल्या कॉम्पॅक्ट आणि लाईटवेट रचनेमुळे घटनास्थळी लवकरात लवकर पोहोचते. वाहनात असलेल्या एकत्रित वैशिष्ट्यांमुळे लवकरात लवकर बचावकार्य पार पडते व जिवितहानी व वित्तहानी टाळण्यास मदत होते.

 • अग्नि प्रतिबंधक वाहनामधील हाय प्रेशर जेटिंग सिस्टममुळे अतिशय प्रखर आगीवर मात करता येते व अत्याधुनिक बचाव टूल्समुळे लोकांचे बचावकार्य आणि मौल्यवान वस्तू वाचविण्यास मदत होते.

 • अपघातात सापडलेल्या लोकांसोबतच ती विझविण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आयुष्यदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. या वाहनामध्ये आग विझविणाचे तसेच बचावकार्यात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व टूल्स आणि यंत्रणांची सोय उपलब्ध आहे. या यंत्रणेमार्फत तात्काळ मदत आवश्यक असल्यास बॅकअप टीमशी संपर्क साधला जातो.

 • आर्यनच्या बहुउद्देशीय वाहनात शक्तिशाली चेसिस इंजिन असून जास्तीत जास्त भार सहन करण्याची क्षमता आहे. वाहनात १ अधिक ३ अशी आसनक्षमता असून बचावकार्यासाठी आवश्यक उपकरणे सामावून घेण्याचीदेखील क्षमता आहे. या वाहनास एआरएआय मानकांनुसार परवानगी मिळालेली आहे.

 • आगीशी सामना करण्यास आवश्यक उपकरणांसह सज्ज असणाऱ्या या वाहनात लहान घटनांना एकट्याने प्रतिसाद देण्याची तसेच उच्च कार्यक्षम प्रतिसाद यंत्रणेत फ्रंटलाईन/ अतिरिक्त प्रतिसाद वाहक म्हणून काम करण्यास सक्षम आहे.

 • वैशिष्ट्ये आणि कार्ये :

  • २१ विविध कार्यांसाठी प्राथमिक टूल्स

  • जीपीएस नेव्हिगेशन यंत्रणा

  • इन्फ्रारेड कॅमेरा

  • जलसंचय टाकीसह फायर फायटिंग यंत्रणा

  • अग्निशमनासाठी नव्या पद्धतींचा अवलंब

  • ही अत्याधुनिक आणि अद्ययावत यंत्रणा अत्यंत वाजवी दरात उपलब्ध असून या वाहनात फायर टेंडरिंग तसेच आणीबाणीच्या परिस्थितीत बचाव कार्य करण्याचे एकत्रित वैशिष्ट्य उपलब्ध आहे. यामुळे कमी वेळात प्रभावीपणे आपत्ती व्यवस्थापन करता येते.

  • शहरे, खेडी, किनारपट्टी, हिल्स स्टेशन अशा सर्व प्रकारचे हवामान असणाऱ्या भौगोलिक प्रदेशांमध्ये व कोणत्याही कठीण परिस्थितीत कार्य करण्यास सक्षम वाहन

  • ही प्रणालीस तैनात करण्यासाठी मनुष्यबळ आणि स्रोतांचा कार्यक्षम वापर केला जातो.

  • फायर सर्व्हिस लोकेशन्सच्या मागणीनुसार कस्टमाईज्ड टूल्स उपलब्ध

  • जास्तीत उपकरणांचा भार वाहून नेण्यासाठी वाहनाची प्रभावी उपयोग

  • अतिशय जास्त ट्रॅफिक असेल अशा परिस्थितीत चंचल पद्धतीने हालचाल आणि कार्य करण्यास सक्षम

Pmc Care Master Tag: