अग्निशामक विभाग

Select FIRE SAFETY

अग्निसुरक्षित इमारती

सहसा अनेक मजली इमारतींना आगीचा अधिक धोका असतो. मात्र ही आग थांबवता येऊ शकते. त्यासाठी खालील काही सुरक्षेसंदर्भातील प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात.

या गोष्टी करा

 • इमारतीची रचना, बाहेर पडण्याचे मार्ग, जिन्याचा मार्ग, आपात्कालीन मार्ग आणि फायर अलार्मची जागा यासंदर्भातील संपुर्ण माहिती घ्या.
 • प्रत्येक मजल्यावर आग विझविण्यासाठी उपलब्ध उपकरण कसे हाताळायचे हे तुम्ही शिकून घ्या आणि सुरक्षा रक्षकालाही शिकवा. तसेच त्यांना आग विझविण्यासंदर्भात आवश्यक तंत्रज्ञान वापराचे प्रशिक्षण द्या.
 • आग विझविण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे सुस्थितीत आहेत याची काळजी घ्यावी
 • ठराविक काळानंतर बाहेर पडण्यासाठी आवश्यक प्रात्याक्षिके करुन पाहा .
 • आगीचे प्रमाण लहान असले तरीही लगेच अग्निशमन दलाला बोलावून घ्या .
 • सुरक्षेसंदर्भात अग्निशमन विभागाचा सल्ला घ्या.
 • अग्निशमन विभागाच्या कर्मचार्याला आगीचे ठिकाण आणि आगीचे प्रमाण, अडकलेल्या व्यक्तींविषयी माहिती, पुरवा.

या गोष्टी करु नका

 • इमारतीच्या अंगणात अतिक्रमण टाळा. तसेच कोणतेही सामान अंगणात साठवू नका. आणीबाणीच्या काळात आग विझविण्यासाठी आवश्यक उपकरणे ठेवण्यासाठी मोकळ्या जागांची आवश्यकता असते.
 • जाण्या येण्याचा रस्ता किंवा जिन्यात कोणतेही अडथळे नाहीत याची काळजी घ्यावी. आणीबाणीच्या परिस्थिती असे मार्ग मोकळे असावेत.
 • जिन्यावरील फायरडोअर उघडे ठेऊ नका. आणीबाणीच्या परिस्थितीत धूर किंवा उष्णता जिन्यात शिरल्यास लोकांना बाहेर पडण्यासाठी अडचणी येऊ शकतात.
 • आणीबाणीच्या परिस्थितीत बाहेर पडताना चुकुनही लिफ्टचा वापर करु नका .
 • इलेक्ट्रिक मीटर असणार्या जागांचा साठवण, किंवा कचरा टाकण्यासाठी किंवा नोकरांना राहण्यासाठी उपयोग करु नका. अशा जागांवर आगीचा मोठा धोका असतो.
 • दिवाळीच्या काळात ज्वलनशील पदार्थ बाल्कनीमध्ये ठेऊ नका. या काळात घराबाहेर कपडे वाळवू नका. फटाक्यांमूळे अनेक वाईट प्रसंग घडलेत.
 • परवानगीशिवाय तळघराचा वापर करु नका. ऑक्सिजनची कमतरतेमुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
 • इलेक्ट्रॉनिक डक्ट बंद करुन ठेवा. यामुळे आगीचा प्रसार रोखला जाऊ शकतो.
 • एसी डक्टिंग एका मजल्यावरुन दुसर्या मजल्यावर जाणार नाही याची काळजी घ्या. या डक्टमधून वाहणारा धूर, अग्नि आणि उष्णता इमारतीच्या इतर भागांमधून पसरु शकते.
 • फायर डिटेक्टर किंवा स्प्रिंकलर हेड्सला रंग देऊ नका. असे केल्यास, ते निरुपयोगी ठरु शकतात.
 • कॉमन कॉरिडॉरमध्ये डिझाईनसाठी लाकडाचा वापर करु नका. यामुळे आगीचा धोरा वाढू शकतो.
 • फायर/स्मोक डिटेक्शन सिस्टम बंद करु नका. यामुळे आग लागल्यावर सूचना मिळण्यास अडचणी येऊ शकतात.
 • इमारतीला आग लागल्यानंतर संपुर्ण इमारतीची वीज बंद करु नका. यामुळे अग्निसुरक्षा आणि अग्निरोधक यंत्रेदेखील बंद पडू शकतात.

इमारतीमध्ये कोणतेही बदल करताना अग्निशमन विभागाशी सल्लामसलत करा.