अग्निशामक विभाग

Select FIRE SAFETY

प्रौढांसाठी अग्नी सुरक्षा

आगीपासून सुरक्षेसाठी प्रौढांकरिता टिप्स

स्वयंपाकासंदर्भातील सुरक्षा

 • स्वयंपाक करताना कायम सतर्क राहा. दुर्लक्ष झाल्यास स्वयंपाकघरात आग लागू शकते
 • कपड्यांचा आगीशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्या
 • टॉवेल, लाकडी चमचे आणि अन्नपदार्थांची पाकिटे पटकन पेट घेऊ शकतात. स्टोव्ह आणि ज्वालांपासून या वस्तू दूर ठेवा
 • गरम भांडी, काडेपेटी आणि लाईटरसारख्या वस्तू लहान मुलांपासून लांब ठेवा
 • लहान मुलांना स्वयंपाकघरापासून लांब ठेवा. मोठ्या मुलांना स्वयंपाकादरम्यान घेतल्या जाणाऱ्या सुरक्षेविषयी माहिती द्या

उष्णतेपासून सुरक्षा :

 • टेबल किंवा ओट्याच्या काठाला गरम अन्न किंवा द्रवपदार्थांची भांडी ठेऊ नका
 • स्वयंपाक करताना लहान मुलांना जवळ घेण्याचे टाळा
 • लहान मुलांना आंघोळ घालताना पाण्याचे तापमान तपासा
 • गरम पाणी किंवा हिटरपासून लहान मुलांना लांब ठेवा

विद्युत उपकरणांबाबत घ्यावयाची काळजी :

 • विद्युत सॉकेट्सचा वापर जपून करा. एकावेळी अनेक गोष्टींसाठी सॉकेट वापरल्यास उष्णता वाढून आगीचा प्रसंग घडू शकतो
 • ओले कपडे किंवा बूट अंगावर असताना विद्युत उपकरणे हातात घेऊ नका
 • इस्त्री, टोस्टर आणि हिटर यांसारख्या उपकरणांचा वापर पूर्ण झाल्यावर स्विच बंद करायला विसरु नका
 • खराब झालेल्या विद्युत वाहिन्या त्वरित दुरुस्त करुन घ्या

ज्वालांपासून सुरक्षा :

 • जळती मेणबत्ती, डासांना मारण्यासाठी कॉईल्स आणि कंदील लहान मुलांपासून लांब ठेवा. तसेच घरातील फर्निचर, पडदे आणि इतर ज्वलनशील वस्तूंचा या गोष्टींशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्या.
 • सिगरेट विझविण्यासाठी अ‍ॅशट्रेचा वापर करा. सिगरेट डस्टबिनमध्ये फेकू नका.

फटाक्यांपासून सुरक्षा :

 • फटाके लावताना सुती कपडे घाला
 • फटाके लावताना लहान मुलांना योग्य मार्गदर्शन करा
 • एकदा न पेटलेला फटाका पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करणे धोकादायक आहे
 • घर आणि झाडांपासून लांब मोकळ्या मैदानावर फटाके वाजवा
 • फटाके वाजवताना सोबत बादलीत माती भरुन ठेवा. आग विझवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.

आग लागल्यानंतर घ्यावयाची काळजी :

 • आग पेटल्यानंतर कशी सुटका करता येईल यासंदर्भात कुटुंबासोबत पुर्वयोजना करुन ठेवा. घराबाहेरील सुरक्षित जागा हेरुन ठेवा
 • पुणे शहरातील अग्निशमन दल(101) आणि अ‍ॅम्ब्युलन्स(108) संपर्क क्रमांक लक्षात ठेवा